
जम्मू – ‘श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘आय.ए.एस्.’ (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी सचिन कुमार वैश्य यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. ते श्री वैष्णोदेवीशी संबंधित कटरा येथील एका संस्थेच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्या वेळी पुजारी मंत्रोच्चार करत होते. पुजार्यांनी त्यांना जोडे काढून उद्घाटन करण्यास सांगितले असता ते अप्रसन्न होत संतापले. त्यांनी ‘मी म्हणूनच अशा ठिकाणी येत नाही’, असे म्हटल्याचे दिसते. यामुळे उपस्थित लोक अप्रसन्न झाले; मात्र कुणीही त्यांचा प्रतिवाद केला नाही.
Outrage at Shri Mata Vaishno Devi Shrine Board CEO’s conduct!
The CEO got enraged when asked to remove shoes during mantra chanting
Says "That’s why I do not come for performing rituals."
Removing footwear is a basic rule in Hindu Dharma during puja or mantras. How can an IAS… pic.twitter.com/F676wB9mdl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 9, 2026
१. या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. काहींनी त्यांच्या वर्तनाला ‘अहंकारी’ असे संबोधले.
२. ‘जी व्यक्ती श्री वैष्णोदेवीच्या व्यवस्थापनाचे दायित्व सांभाळते, तिलाच तेथील मूलभूत धार्मिक परंपरा मान्य नाहीत, तर हे विडंबन आहे. श्रद्धेपेक्षा पदाला अधिक महत्त्व दिले जात आहे’, अशी टीकाही करण्यात आली.
३. भाजपच्या युवा मोर्चाचे नेते तांडव सिंह यांनी म्हटले की, अशा मानसिकतेच्या अधिकार्यांचे तात्काळ स्थानांतर करण्यात यावे. त्या ठिकाणी श्रद्धा आणि परंपरा यांचा सन्मान करणारी व्यक्ती नेमली जावी.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !