नास्तिक मेळाव्यातील डॉ. कर्णिक यांच्याकडून संत आणि वारी यांवर टीका

पंढरपूर – ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’च्या वतीने पुणे येथे ‘साने गुरुजी स्मारका’त राष्ट्रीय सेवा दलाच्या माध्यमातून आयोजित ‘महाराष्ट्र नास्तिक मेळावा २०२६’ या कार्यक्रमातील डॉ. मुग्धा कर्णिक यांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या वक्तव्यांमुळे वारकरी संप्रदाय, संत परंपरा, तसेच श्री विठ्ठल भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे समितीने नमूद केले आहे. ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपासून समाजात समता, प्रेम, शांतता आणि आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आदी संतांच्या शिकवणुकीमुळे समाजात सद्भावना आणि नैतिक मूल्ये यांची जपणूक झाली असून ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. ‘संबंधितांनी स्वत:च्या चुकीच्या वक्तव्याविषयी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करून वारकरी संप्रदायाविषयी आदराची भूमिका स्पष्ट करावी’, अशी अपेक्षा ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’ने व्यक्त केली आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार असला, तरी त्याचा वापर करतांना समाजातील विविध धर्म, परंपरा अन् श्रद्धा यांचा आदर राखणे आवश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले. संत परंपरेविषयी अवमानास्पद विधाने समाजात तणाव निर्माण करू शकतात, असेही नमूद करण्यात आले. या निवेदनावर सदस्य श्री. रामचंद्र कदम, श्रीमती शंकुतला नंदगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, श्री. भास्करगिरी बाबा, श्री. संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख, अधिवक्त्या माधवी निंगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, श्री. अतुलशास्त्री भगेगुरुजी, ह.भ.प. शिवाजी मोरे, तसेच पदसिद्ध सदस्या, सौ. प्रणिता भालके आदींची नावे नमूद केली आहेत.
| काय होते वक्तव्य ?
डॉ. कर्णिक यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली यांचा त्यांच्या भाषणात ‘आडानदेव’, असा अयोग्य उल्लेख केला होता. त्याचप्रमाणे श्री विठ्ठल आणि वारी या कालबाह्य गोष्टी असल्याचेही विधान केले होते. |
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव