Nepal Entry Permit : नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी आता भारतीय वाहनांना घ्यावा लागणार प्रवेश परवाना !

काठमांडू (नेपाळ) – भारतीय नोंदणी क्रमांक असलेल्या दुचाकींना नेपाळमध्ये प्रवेश करतांना प्रवेश परवाना घेणे बंधनकारक असेल, असे नेपाळ प्रशासनाने घोषित केले आहे. याखेरीज निश्चित कालावधीसाठी पासही दिला जाईल. या आधारावर केवळ मुख्यालय परिसरापर्यंतच फिरण्याची अनुमती दिली जाईल, तर आत प्रवेश करतांना सीमाशुल्क भरणे अनिवार्य असेल.

भारतियांमध्ये संताप

या नियमामुळे काही भारतीय नागरिकांमध्ये अप्रसन्नता निर्माण झाली. ‘भारतीय वाहनांवर अधिक कठोर निर्बंध लादले जात आहेत, तर नेपाळी वाहने भारतात मुक्तपणे फिरत आहेत. नेपाळी वाहनांच्या भारतातील प्रवेशासाठीही असेच नियम लागू करावेत’, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ‘सीमावर्ती भागापर्यंत वाहतुकीला अनुमती द्यावी; परंतु प्रवेशावेळी कर किंवा प्रवेश शुल्क अनिवार्य करावे’, असे भारतियांचे म्हणणे आहे.