
मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वर्ष २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींच्या माध्यमातून १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा या उत्पन्नात ३३ कोटी २९ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. या यशाचे मुख्य कारण म्हणजे शासनाकडून शालेय सहलींसाठी मिळणारी ५० टक्के भाडे सवलत आणि महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या नवीन, अद्ययावत् बसगाड्या हे आहे.
ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घेत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. आगामी शैक्षणिक वर्षातही खासगी बसगाड्यांच्या ऐवजी महामंडळाच्या गाड्यांचाच वापर करण्याचे आवाहन परिवहनमंत्र्यांनी केले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक