शिमला (हिमाचल प्रदेश) येथील श्रीराममंदिराच्या सभागृहात मुसलमानांच्या विवाहाचे प्रकरण
शिमला (हिमाचल प्रदेश) – येथे हिंदु संघर्ष समितीने सूद सभा संचलित श्रीराममंदिराच्या सभागृहात ‘निकाहा’साठी (विवाहासाठी) मुसलमान कुटुंबाने केलेल्या नोंदणीवर आक्षेप नोंदवला आहे. समितीने चेतावणी दिली आहे की, ‘असे झाल्यास त्या दिवशी तेथे डुकरांची वरात काढण्यात येईल आणि मुंडन करण्यात येईल.’ या चेतावणीनंतर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनही सतर्क झाले आहे.
१. महंमद नासिर हे शिमला येथील ईदगाह कॉलनीतील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलीचा निकाह ११ एप्रिल या दिवशी होणार असून त्यासाठी त्यांनी श्रीराममंदिराचे सभागृह आरक्षित केले आहे.
२. हिंदु संघर्ष समितीचे नेते विजय शर्मा आणि मदन ठाकूर यांनी मंदिराच्या मालमत्तेच्या ठिकाणी मुसलमान कुटुंबाचा विवाह मान्य नसल्याचे म्हटले आहे. ‘संबंधित कुटुंबाने हा विवाह मशीद किंवा मदरसा येथे करावा, मंदिराच्या मालकीच्या जागेत नाही’, असे म्हटले आहे.
३. सूद सभा शिमलाचे अध्यक्ष राजीव सूद यांनी सांगितले की, यापूर्वीही श्रीराममंदिराच्या सभागृहात मुसलमान कुटुंबांचे निकाह झाले आहेत. देशाची राज्यघटना आणि सूद सभेचे नियम धर्माच्या आधारावर कुणालाही रोखण्याची अनुमती देत नाहीत. श्रीराममंदिराच्या सभागृहात विवाह असो किंवा निकाह, येथे मद्य आणि मांसाहार यांवर आधीपासूनच बंदी आहे, ती पुढेही कायम राहील. येथे स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते आणि मागील ५ वर्षांत मुसलमान कुटुंबांचे १५हून अधिक निकाह येथे झाले आहेत. तरीही या विषयावर अप्रसन्नता व्यक्त केली जात असेल, तर कार्यसमितीच्या बैठकीत त्यावर चर्चा केली जाईल.

Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath