
मुंबई – आखातील देशांतील वाढत्या भौगोलिक-राजकीय तणावामुळे पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा अस्थिर झाला असला, तरी महाराष्ट्र राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एल्.पी.जी. गॅस यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्य सरकार आणि तेल विपणन आस्थापने पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन राज्यशासनाने केले आहे.
१. राज्यात सध्या नियमित १८ सहस्र ५०० किलोलिटर पेट्रोल आणि ४० सहस्र किलोलिटर डिझेलचा पुरवठा केला जात आहे. राज्यातील ८ सहस्र १२६ पेट्रोल पंपांना २४ डेपोंच्या माध्यमातून अखंडित पुरवठा चालू आहे.
२. राज्यात अनुमाने ३ कोटी पाच लाख एल्.पी.जी. ग्राहक आहेत. घरगुती गॅसची डिलिव्हरी सुरक्षित करण्यासाठी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ अनिवार्य करण्यात आला आहे. सध्या ८५ टक्के डिलिव्हरी याच माध्यमातून होत आहे.
३. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि अनाथाश्रम यांना १०० टक्के पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. हॉटेल, ढाबे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांनाही प्राधान्याने गॅस वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत.
घरगुती गॅसचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कारवाईच्या अंतर्गत ५३ गुन्हे नोंदवण्यात आले असून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित