सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण !

मंडणगड – तालुक्यातील लाटवण-पिंपळगाव (रामवाडी) येथील नदीवर उभारण्यात येणारा पूल पूर्ण होण्याआधीच कोसळल्याची बातमी सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती; मात्र या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘पूल कोसळला नसून बांधकामातील तांत्रिक त्रुटींमुळे तो पाडण्यात आला आहे’, असे स्पष्टीकरण दिले आहे.
कनिष्ठ अभियंता जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार
१. हा पूल ४ एप्रिलला दुपारी १ ते ३ या वेळेत नियोजनपूर्वक पाडण्यात आला. पुलाच्या बांधकामामध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. पुलाचे स्लॅब कास्टिंग (काँक्रिट ओतण्याची प्रक्रिया) योग्य पद्धतीने झाले नव्हते; त्यामुळे भविष्यात कोणताही अपघात होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
२. पहिल्याच टप्प्यात पुलाच्या गुणवत्तेविषयी शंका निर्माण झाल्यानंतर संबंधित अधिकार्यांनी तांत्रिक पहाणी केली. या पहाणीत काही गोष्टी निकषांनुसार नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी अपूर्ण बांधकाम सुधारित करण्याऐवजी पूल पाडून नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
३. संबंधित पुलाचे काम पुन्हा नव्याने आणि योग्य तांत्रिक मानकांनुसार चालू करण्यात येणार आहे. येत्या आठवड्यात कामाला प्रारंभ होईल..”
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !