देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील सिद्धेश्वर महाराज मंदिरात चोरी

३ किलो चांदीचा मुकुट चोरला

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर महाराज मंदिरातील काचेच्या कपाटात ठेवलेला ३ किलो वजनाचा, नागाच्या फणीची आकृती आणि खडे असलेला चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने कपाटाचा दरवाजा तोडून चोरून नेला. १ लाख ९५ सहस्र रुपयांचा चांदीचा मुकुट २ एप्रिल या दिवशी सकाळी १० वाजता चोरीला गेला आहे. या प्रकरणी मंदिराची देखरेख करणारे श्री. भानुदास औताडे यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. दिवसाढवळ्या ही चोरीची घटना घडल्याने मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूबहुल देशात हिंदूंचीच मंदिरे असुरक्षित !