
मेंढ्यांच्या झुंजी लावल्यामुळे गुन्हा नोंद
मुंबई – एक लाख रुपयांच्या बक्षिसासाठी मेंढ्यांच्या झुंजी लावून त्यांना क्रूर वागणूक दिल्याचा प्रकार जोगेश्वरी येथे घडला. ‘प्राणी मित्र संघटने’च्या लेखी तक्रारीवरून मेंढी मालकासह तिघांविरोधात पालिसांनी गुन्हा नोंद केला. साजिद अब्दुल लतीफ सैयद, सौद फिरदौस मास्टर आणि इम्रान महंमद अली कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत. (मुसलमानांची क्रूर मानसिकता दर्शवणारी घटना ! – संपादक)
जे.एन्.पी.ए. बंदराला जोडणारा पूल खचला
रायगड – जे.एन्.पी.ए.च्या चौथ्या बंदराला जोडणारा पूल खचल्याने उरणमधील वाहतूक विस्कळीत झाली. सुरक्षा म्हणून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार ! – संपादक) या पुलावरून प्रतिदिन सहस्रो अवजड कंटेनर वाहनांची वाहतूक होते. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. काही भाग खचल्यामुळे पुलाच्या कामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकरी उत्पादक आस्थापनाची ३० लाखांची फसवणूक
नाशिक – स्वत:च्या पदाचा गैरवापर करून शेतकरी उत्पादक आस्थापनाच्या (ग्राहकाच्या) अनुमतीविना खात्यातून ३० लाख रुपये बळकावल्याचा धक्कादायक प्रकार ‘बँक ऑफ महाराष्ट्रा’च्या मागाव शहर शाखेत उघडकीस आला. बँक व्यवस्थापक प्रतीक मीना यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे; मात्र संशयिताला अद्याप अटक झालेली नाही.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करावी ! – फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबई – बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणे, हे महाराष्ट्रासाठी साजेसे आहे. सर्वच पक्षांनी मन मोठे करून ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीय पक्षांना केले आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे. या निवडणुकीसाठी २३ एप्रिल या दिवशी मतदान होणार असून ४ मे या दिवशी निकाल घोषित केला जाणार आहे.
या निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे साहाय्य मागितले आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी साहाय्य करण्याची शक्यता आहे.
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
नागपूर येथे मानसिक तणावातून ‘नीट’ परीक्षेतील विद्यार्थिनीची आत्महत्या
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन