ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रशासकीय अधिकार्यांना धक्काबुक्की

सोलापूर – माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील खेलोबा मंदिराच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ३१ मार्चच्या रात्री ‘खेलोबा मंदिर ट्रस्ट’च्या जागेत स्थापन करण्यात आला. ‘हा पुतळा आमच्या जागेत अनुमतीविना स्थापन करण्यात आला’, असा दावा मंदिर न्यासाने करून तो हटवण्यासाठी कृती केल्याने पुतळा बसवणार्या गटाकडून दगडफेक करण्यात आली होती. तेव्हापासून निर्माण झालेला तणाव तिसर्या दिवशी कायम होता. या ठिकाणी आलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज संबंधित जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्याला धक्काबुक्की केली.
या वादामुळे धनगर समाजाचे लोक आणि मराठा समाजाचे लोक या ठिकाणी ३ दिवसांपासून एकमेकांसमोर तळ ठोकून आहेत. एका गटाचे म्हणणे आहे की, ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची म्हणजे प्रशासनाची आहे, तर दुसर्या गटाचे म्हणणे आहे की, ही जागा मंदिराची आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येत पोलीस असून दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेडींग केले आहे. लक्ष्मण हाके यांनी मागणी केली की, पुतळा येथून सन्मानाने हटवून तो ज्यांनी स्थापन केला त्यांच्या जागेत अथवा अन्य जागी स्थापन करावा.
या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, हा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असल्यामुळे षड्यंत्र करून जातीय तणाव निर्माण केला जात आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा