
कोल्हापूर – शहर आणि परिसरात जयंती नदीसह शहरातील विविध नाल्यांमधून वाहून आलेला ५० टनांहून अधिक कचरा राजाराम बंधार्यात अडकला आहे. गेल्या २ दिवसांपासून शहरात झालेल्या अवेळी पावसाने नाले दुथडी भरून वाहू लागले आणि त्याच समवेत असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, थर्माकोल, टायर, गाद्या, तसेच अन्य वस्तू असा कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आला आहे. या कचर्याचा २ फुटांपेक्षा अधिक थर राजाराम बंधार्याजवळ साचला आहे. या कचर्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी काळपट झाले असून त्याला दुर्गंध येत आहे.
प्रदूषण मंडळाचे अधिकारी आणि महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी काय करत आहेत ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
संपादकीय भूमिकाप्रत्येक वेळी गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते म्हणून कांगावा करणारे साम्यवादी-पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आता कुठे आहेत ? |
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच