मी मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना अल्पसंख्यांकांच्या सूचीतून वगळेन ! – Basanagouda Patil Yatnal

कर्नाटकातील भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांचे विधान

भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ

विजयपूर (कर्नाटक) – मुसलमानांंची लोकसंख्या लक्षणीयरित्या वाढत असून त्यांना अल्पसंख्य मानणे चुकीचे आहे. मी जर राज्याचा मुख्यमंत्री झालो, तर माझ्या मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मुसलमानांना अल्पसंख्यांकांच्या सूचीतून वगळून टाकेन, असे विधान भाजपचे निलंबित आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली. ‘या निर्णयावर मी ठाम असून सत्ता मिळाल्यास मी हा निर्णय नक्कीच कार्यान्वित करीन’, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

आमदार यत्नाळ पुढे म्हणाले की, भारतात सर्वांसाठी समान कायदा असायला हवा. एखाद्या विशिष्ट वर्गाला विशेष सवलती किंवा दर्जा देण्याची आवश्यकता नाही.

संपादकीय भूमिका

  • या देशात ‘अल्पसंख्य’ कुणाला म्हणावे ?, याची आता व्याख्या करणे आवश्यक ठरले आहे. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत किती टक्के लोकसंख्या असल्यावर संबंधित धर्मियांना ‘अल्पसंख्य’ म्हटले जावे ?, हे स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे !
  • वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार देशात मुसलमान १४ टक्के आहेत; मात्र गेल्या १५ वर्षांत त्यांची लोकसंख्या वाढलेली दिसून येत असल्याने ती २० टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता असल्याने त्यांना अल्पसंख्यांकांच्या सूचीतून कुणी बाहेर काढण्याची मागणी करत असेल, तर ते चुकीचे ठरणार नाही !