पहिल्या टप्प्यातील १४३ कोटी ९० लाख रुपयांच्या कामास प्रारंभ

श्री. अजय केळकर, कोल्हापूर
कोल्हापूर, ३ एप्रिल (वार्ता.) – साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या ‘श्री महालक्ष्मीदेवी देवस्थान विकास परिसरा’च्या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील १४३ कोटी ९० लाख रुपयांच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात मंदिराच्या आतील आणि बाहेर खांब, भिंती स्वच्छ करण्यात येत आहेत. ‘सँड ब्लास्टिंग’ (वाळूचा मारा करून स्वच्छता करणे) द्वारे खांबांची स्वच्छता करण्यात येत आहे. यामुळे खांबांमध्ये शेवाळ, तेल अथवा अन्य काही पदार्थ असतील, तर ते पूर्णत: स्वच्छ होत आहेत. या संवर्धनाच्या कामामुळे मंदिर आणि पुरातन मूर्ती यांच्या मूळ सौंदर्याला झळाळी मिळाली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देतांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे म्हणाले की,
१. श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात गेल्या ५०-६० वर्षांत काही पालट करण्यात आलेले आहेत. हे सर्व पालट दूर करून मंदिराला आहे, त्या मूळ सुस्थितीत आणण्याचे आपले प्रयत्न आहेत. यात मंदिराच्या बाहेरील ज्या ओवर्या आहेत आणि तेथील देवतांच्या मूर्ती यांचेही संवर्धन करण्यात येत आहे.
मनकर्णिका कुंडाचे काम अंतिम टप्प्यात![]() मनकर्णिका कुंडाच्या संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कुंडाच्या ओवर्याचे काम पूर्ण होत आले असून काही भिंती, तसेच काही दगडी बांधकाम पूर्ण करण्यात येत आहे. येथे विशेष दिव्यांची सोय करण्यात येत असून लवकरच भाविकांसाठी एक सुंदर आणि भव्य असे कुंड पहाण्यासाठी खुले होणार आहे. |
२. ‘सँड ब्लास्टिंग’ केल्यानंतर खांबांच्या ज्या भेगा दिसत आहेत, त्या विशेष पदार्थ वापरून भरून घेण्यात येत आहेत. याचसमवेत मंदिरात पावसाचे पाणी गळू नये म्हणून ‘वॉटर प्रुफींग’चा (पाणी न येण्याच्या ‘मिश्रणा’चा) परत एक हात देण्यात येत आहे.
३. या मंदिराच्या सभोवताली असलेल्या ४२ मंदिरांचे संवर्धनही देवस्थान समितीने हातात घेतलेले आहे. यात पहिल्या टप्प्यात जोतिबा मंदिर, काशीविश्वेर मंदिर, कार्तिक स्वामी, उत्तरेश्वर मंदिर अशा १७ मंदिरांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
४. येत्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत साधारणत: गरूड मंडपाचे काम पूर्ण करण्याचे मंदिर समितीचे प्रयत्न आहेत. खालील फरशीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. बाजूचे विशेष खांब घडवण्याचे काम चालू असून हे कामही गतीने चालू आहे.

| मंदिर परिसरात असलेल्या ६४ योगिनी, भैरव, काळवेताळ, यक्ष यांसह अन्य अशा १५६ देवतांच्या मूर्ती पुन्हा एकदा जतन करण्यात येणार आहेत. काही मूर्तींना हात, पाय, डोळे-कान, तसेच अन्य अवयव नाहीत किंवा अस्पष्ट झाले आहेत, ते सर्व अवयव घडवण्यात येत आहेत. यामुळे मूर्तींचे मूळ सौंदर्य पुन्हा प्राप्त होत असून हे मंदिर ज्या स्थापत्यशैलीत घडवले, त्याच स्थितीत पुन्हा एकदा भाविकांना पहाता येणार आहे. |

हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न