|

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – खासगी मालमत्तेवर मोठ्या संख्येने लोकांना एकत्र करून नमाजपठण करणे योग्य नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने बरेली येथील सामूहिक नमाजपठणाच्या प्रकरणात दिला. न्यायालयाने खासगी मालमत्तेवरील अशा सामूहिक नमाजपठणाच्या प्रथेवर आक्षेप घेत ती रोखण्याचे निर्देश दिले. तसेच शांतता भंग होण्याची शक्यता असल्यास प्रशासनाला कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
१. न्यायालयाने नमूद केले की, वैयक्तिक सुरक्षा आणि खासगी मालमत्ता यांच्या आडून सार्वजनिक सुव्यवस्था अन् लोकशांतता धोक्यात घालता येणार नाही.
२. बरेली येथील रहिवासी तारिक खान यांनी रमझानच्या काळात खासगी मालमत्तेच्या ठिकाणी नमाजपठण करण्यावर घातलेल्या बंदीच्या विरोधात आणि शांतता भंग प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती.
३. राज्य सरकारकडून अतिरिक्त महाधिवक्ता अनूप त्रिवेदी यांनी न्यायालयास कळवले की, याचिकाकर्ता सुरक्षेच्या कारणांचा आधार घेऊन नियमांचा गैरवापर करत आहे. सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र आणि पुरावे यांनुसार याचिकाकर्त्याच्या खासगी मालमत्तेवर प्रतिदिन ५० ते ६० लोक नमाजपठणासाठी एकत्र येत होते, ज्यामुळे परिसरातील धार्मिक सौहार्दता आणि सुरक्षितता यांना धोका निर्माण होत होता.
५. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य असून सार्वजनिक शांततेत अडथळा निर्माण करणार्या अशा प्रथांना अनुमती देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
६. पुन्हा नमाजपठणाच्या नावाखाली जमाव गोळा करून परिसरातील शांततेला बाधा आणल्यास जिल्हा प्रशासन आणि पोलीस कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यास पूर्णपणे मोकळे असतील.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !