
पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – ज्या ‘गदे’द्वारे श्री मारुतीरायाने असुरांचा संहार केला आणि दृष्ट प्रवृत्तींपासून सज्जनांचे रक्षण केले. अशा या शौर्याचे प्रतिक असणार्या ‘गदे’चे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्ो येथे विविध ठिकाणी पूजन करण्यात आले. त्यामध्ये हडपसर, सासवड, कात्रज, चिंचवड, तळेगाव, मोशी, भोसरी, मोई, केडगाव येथील मंदिरांमध्ये ‘गदापूजन’ करण्यात आले. तसेच ‘हिंदु राष्ट्राची शपथ’ घेण्यात आली. या वेळी ३२ हून अधिक ठिकाणी पूजन पार पडले. या वेळी ८६८ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
![]() |
![]() |
| सासवड येथे गदापूजन करतांना धर्माभिमानी | धायरी येथे गदापूजन करतांना धर्माभिमानी |
या वेळी मोई येथील उद्योजक श्री. गोरखदादा गवारे, काळेवाडी (सासवड) येथील ह.भ.प. प्रवीण महाराज लोळे, चिंचवड गावातील ‘चावडी हनुमान देवस्थाना’चे विश्वस्त श्री. आवेश चिंचवडे, तळेगाव येथील शनी मंदिराचे विश्वस्त श्री. महादेव वर्तले, तसेच अन्य मान्यवर विविध ठिकाणी उपस्थित होते.

‘गदापूजना’मुळे उपस्थित भाविकांचा भाव जागृत झाला. हिंदु जनजागृती समिती, मंदिर महासंघ, वारकरी संप्रदाय आदी संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवला.


वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !