निवासी आधुनिक वैद्यांच्या संघटनांचा आरोप

मुंबई – राज्यातील निवासी आधुनिक वैद्य प्रचंड मानसिक दबावाखाली काम करत असून परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या थीसिसवर (संशोधन प्रबंधांवर) स्वाक्षरी मिळवण्यासाठी २-३ लाख रुपयांची मागणी केली जात आहे, अशा गंभीर तक्रारी निवासी आधुनिक वैद्यांच्या संघटनांनी केल्या आहेत.
१. निवासी आधुनिक वैद्यांच्या कामाच्या वेळा अत्यंत अनियमित असून काही ठिकाणी सलग १२ घंटे, तर काही ठिकाणी ४८ घंट्यांपर्यंत काम करावे लागते.
२. संशोधन प्रबंधांवर स्वाक्षरीसाठी पैसे मागण्याचा प्रकार मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, मिरज, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अंबाजोगाई अशा अनेक ठिकाणी घडतो.
३. अन्यायाविरोधात आवाज उठवणार्या आधुनिक वैद्यांना अनुत्तीर्ण करण्याच्या धमक्या दिल्या जातात. शस्त्रकर्म शिकणार्या आधुनिक वैद्यांच्या ते करण्याची संधी नाकारली जाते. शिक्षणात अडथळे निर्माण होण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थी मौन बाळगतात.
संपादकीय भूमिकावैद्यकीय क्षेत्राला कलंकित करण्याचाच हा प्रकार होय ! असे करणार्यांकडून त्यांनी आतापर्यंत लुबाडलेली रक्कम सव्याज वसूल करायला हवी ! |
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !