|
(डीप स्टेट म्हणजे सरकारी अधिकारी, सैन्याधिकारी, खासगी संस्था, अब्जाधीश उद्योगपती यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुप्त जाळे. या व्यवस्थेद्वारे अमुक देशातील सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात अथवा त्यांना अनुकूल असे वातावरण देशात निर्माण केले जाते.)

ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांना ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी सत्तेतून हटवल्यानंतर ‘डीप स्टेट’ने महंमद युनूस यांना किमान वर्ष २०२९ पर्यंत सत्तेत ठेवण्यासाठी संपूर्ण कट रचला होता, असा गंभीर दावा युनूस यांच्या सरकारमधील एका मंत्रालयाचे सल्लागार आसिफ महमूद शोजिब भुईयां यांनी केला. यासाठी त्यांनी २६ डिसेंबर २०२४ या दिवशी ‘नॅशनल सिटिझन पार्टी’च्या केंद्रीय कार्यालयात झालेल्या एका बैठकीचा संदर्भ दिला. हा पक्ष महंमद युनूस आणि त्यांच्या सहकार्यांच्या पाठिंब्याने स्थापन झालेला राजकीय पक्ष आहे.
Allegations from within! ⚠️
Muhammad Yunus’ close aide Asif Mahmud claims he had backing from the “American Deep State” 🇺🇸
👉 Alleged plan: keep Yunus in power till 2029
👉 Raises questions on unrest in Bangladesh & targeted violence against Hindus
If true, this isn’t just… pic.twitter.com/mv4zfOeq5X
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
आसिफ महमूद यांनी केलेले काही महत्त्वाचे दावे !
१. आम्ही सरकारमध्ये असतांना आरंभीच्या काळात आम्हाला प्रभावशाली संस्थांकडून प्रस्ताव आले. या संस्थांना सामान्यतः ‘डीप स्टेट’ म्हटले जाते. त्यांनी सुचवले की, आम्ही शेख हसीना यांचा वर्ष २०२९ पर्यंतचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करू आणि त्यासाठी त्या संस्था आम्हाला संपूर्ण पाठिंबा देतील.
२. तथापि या संस्थांच्या काही विशिष्ट मागण्या होत्या. यांत काही क्षेत्रांमध्ये त्यांच्या हितसंबंधांना पुढे नेण्याचा समावेश होता. यासाठी त्यांनी संपूर्ण आराखडाही सिद्ध केला होता.
३. त्यांचा युक्तीवाद असा होता की, विरोधी राजकीय पक्ष असलेल्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’च्या नेत्यांना आधीच शिक्षा झाली आहे. जर ती कायम राहिली, तर ते निवडणूक लढवू शकणार नाहीत. अशी प्रकरणे न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित ठेवता येऊ शकतात. तुम्हाला ठाऊक आहे, ते कसे होते – वारंवार सुनावणी पुढे ढकलून. (याचा अर्थ ‘डीप स्टेट’ला बांगलादेशात कोणत्याच प्रभावशाली पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नव्हते.)
४. तारिक रहमान यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे आणि जर त्यांची शिक्षा कायम राहिली, तर निवडणुका झाल्या, तरी ते निवडणूक लढवू शकणार नाहीत.
५. आमचे अंतरिम सरकार सत्तेत रहाण्यासाठी संपूर्ण रणनीती सिद्ध करण्यात आली होती.
६. आम्ही एक प्रकारचा हा करार स्वीकारला नाही. आम्ही नेहमी लोकशाहीला प्राधान्य दिले आणि आमच्या बांधीलकीमुळेच निवडणुका घेण्यात आल्या. उलट निवडणुकांवर कोणतेही प्रश्नचिन्ह उभा राहू नये; म्हणून आम्ही स्वेच्छेने सत्ता सोडली.
कोण आहेत आसिफ महमूद शोजिब भुईयां ?
युवा नेते असलेले आसिफ महमूद शोजिब भुईयां जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या विद्यार्थी आंदोलनातील प्रमुख समन्वयकांपैकी एक होते. ते अंतरिम सरकारमध्ये युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार होते. अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
संपादकीय भूमिका
|
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक