पाकिस्तानातील मौलाना मुफ्ती सईद खान यांनी केले उघड
(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक, तर मुफ्ती म्हणजे शरीयत कायद्यानुसार न्यायनिवाडा करणारा)

मुझ्झफराबाद (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये महिलांवर तेथील जिहादी आतंकवादीच अत्याचार करत आहेत, असे वक्तव्य तेथीलच प्रसिद्ध मौलाना मुफ्ती सईद खान यांनी येथे केले. ते म्हणाले की, पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून महिलांचे पद्धतशीर शोषण होत आहे.
‘कश्मीर अँड अवर हायपोक्रसी’ (काश्मीर आणि आपली दुटप्पी भूमिका) नावाच्या कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, काश्मीरमधील उग्रवादामागील एक काळी बाजू म्हणजे आतंकवाद्यांना अनेकदा ‘मुजाहिदीन’ (जिहादसाठी लढणारे) किंवा धार्मिक योद्धा म्हणून गौरवले जाते. तथापि तेच प्रत्यक्षात असाहाय्य महिला निर्वासितांना बलपूर्वक शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडतात. या बदल्यात त्यांना भाकरी दिली जाते.
Shocking claim by Maulana Mufti Saeed Khan: terrorists in Pakistan-Occupied Kashmir are exploiting and assaulting poor women.
If the terrorists, who claim to be waging armed Jihad to secure the alleged "just rights" of Kashmiri Muslims are themselves committing such atrocities,… pic.twitter.com/jjMjVCHkNN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 1, 2026
कोण आहेत मुफ्ती सईद खान ?
मुफ्ती सईद खान हे देवबंदी विचारसरणीशी संबंधित असून पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात.
काय सांगतात भारतीय गुप्तचर यंत्रणा ?
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार खान यांच्या या वक्तव्यास पाकच्या धार्मिक आणि राजकीय व्यवस्थेमधून आलेली दुर्मीळ स्वीकृती मानली जाऊ शकते. यामुळे पाकिस्तानकडून दीर्घकाळ मांडल्या जाणार्या ‘शुद्ध जिहाद’ या कथानकाला मोठा धक्का बसतो.
सूत्रांनी सांगितले की, हे वक्तव्य त्या ‘प्रॉक्सी’ (छुप्या) युद्धनीतीकडे निर्देश करते, ज्यामध्ये आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) समर्थित आणि सशस्त्र आतंकवादी हे स्थानिक लोकांचे शोषण करत होते. या विधानामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अहवालांनाही बळकटी मिळते.
संपादकीय भूमिकाजे आतंकवादी काश्मीरमधील मुसलमानांना त्यांचा कथित न्याय्य अधिकार मिळवून देण्यासाठी शस्त्रांद्वारे जिहाद करत आहेत, तेच जर येथील महिलांवर अत्याचार करत असतील, तर यातून या संपूर्ण इस्लामी मोहिमेचा बुरखाच फाडला जातो ! |
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !