धर्मप्रेमी श्री. कपूर यांच्या कुटुंबात पुत्ररत्नप्राप्ती झाल्याच्या निमित्ताने ‘सुंदरकांड’ पठणाचे आयोजन

नवी देहली – धर्मप्रेमी सौ. मंजुळा आणि श्री. हरीश कपूर यांच्या कुटुंबात पुत्ररत्नप्राप्ती झाल्याच्या निमित्ताने त्यांच्याकडे ‘सुंदरकांडा’चे पठण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांचे परिचित आणि नातेवाईक यांनी उत्साहाने सहभाग घेतला. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती. या कार्यक्रमातील एका विशेष सत्रात ‘सुंदरकांडा’च्या आध्यात्मिक आणि व्यावहारिक पैलूंवर मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘सुंदरकांड हा केवळ एक ग्रंथ नसून जीवन घडवणारा एक दैवी मार्गदर्शक आहे. भक्ती आणि सेवा यांच्या वेळी हनुमान दास्यभावात रहातो; तर राष्ट्र आणि धर्म यांवर संकट येते, तेव्हा तो शक्तीभाव धारण करतो. आपणही आपल्या पुढच्या पिढीला अशाच प्रकारे सक्षम केले पाहिजे. लंकेचे खरे दहन, म्हणजे स्वतःतील अहंकार, मत्सर आणि देहबुद्धी रूपातील असुर दुष्प्रवत्तीला नष्ट करणे होय. जेव्हा मनातील संघर्ष संपतो, तेव्हाच आपल्याला खर्या अर्थाने ‘अयोध्या’ (अ योद्धा) ही अवस्था प्राप्त होते.’’
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार