
मुंबई – नक्षलवाद्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात ८५३ जणांना ठार केले आहे. यामध्ये २४४ पोलीस आणि ६०९ नागरिक यांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ३० मार्च या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची अर्धवार्षिक परिषद झाली. परिषदेनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना वरील माहिती दिली.
या वेळी नक्षलवाद्यांविरुद्ध लढा देणार्या ‘सी-६०’ (महाराष्ट्र पोलिसांचे एक विशेष कमांडो पथक) सैनिकांच्या तुकडीमध्ये किमान ३ वर्षे सेवा केलेल्या सैनिकांना ‘सी-६०’ पदकाने गौरवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘माओवादाच्या विरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळवले आहे. माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. तिच्या पुनरुज्जीवनाला आळा घालणे, हे पुढील मोठे आव्हान आहे.’’
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले