अंबड (जिल्हा नाशिक) येथे गोरक्षकांना मारहाण !

मारहाण करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !

प्रतिकात्मक चित्र

नाशिक – येथील अंबड परिसरात गोमांस विक्री होत असल्याच्या संशयावरून गोरक्षक तेथे गेले होते. (गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोहत्या होतेच कशी ? पोलिसांचे यावर नियंत्रण नाही का ? – संपादक) या वेळी त्यांनाच मारहाण करण्यात आली. याचा नागरिकांनी निषेध केला आहे.

येथील नगरसेवक निवृत्ती इंगोले म्हणाले, ‘‘कायदा हातात घेणार्‍यांना सर्वांनी मिळून वैध मार्गाने विरोध करावा. गोमांस विक्रीचे अड्डे बंद झाले पाहिजेत. आम्ही प्रशासनाला सहकार्य करू.’’ नगरसेविका हर्षदा गायकर म्हणाल्या, ‘‘गोरक्षकांनी आमच्या आणि प्रशासनाच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. गोहत्या कधीच सहन केली जाणार नाही.’’ (लोकप्रतिनिधींनीही केवळ आश्वासन न देता गोरक्षणासाठी कृतीशील व्हावे !  – संपादक)