भोंदू अशोक खरात प्रकरण

मुंबई – नाशिक येथील भोंदू अशोक खरात याच्या समवेत नाव जोडले जात असल्याने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची चौकशी होणार होती; पण विशेष अन्वेषण पथकासमोर (एस्.आय.टी.समोर) उपस्थित रहाण्यास त्यांनी टाळाटाळ केली. ‘मी महिला असून मला प्रवास करण्यास त्रास होतो’, असे हास्यास्पद आणि विक्षिप्त कारण पुढे करून त्यांनी चौकशी टाळली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, ‘‘रूपाली चाकणकर यांनी दिलेले कारण अत्यंत क्षुल्लक आहे. याच चाकणकर जेव्हा खरातच्या ‘शिवनिका’ ट्रस्टच्या कार्यक्रमांना जात होत्या, तेव्हा त्यांना प्रवासाचा त्रास झाला नाही का ? तिथे त्यांचे पदराने पाय पुसले जातांनाचे आणि केक खातांनाचे व्हिडिओ सर्वांनी पाहिले आहेत. मग आताच ‘स्त्री’ असल्याचा अडसर कसा येतो ? त्यांना खरोखर काही लपवायचे नसेल, तर त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे होते.’’
भोंदू अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण दडपण्यासाठी रूपाली चाकणकर यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोप आहे. त्या स्वतः खरातच्या ‘शिवनिका’ ट्रस्टवर सदस्या होत्या. हे समोर आल्याने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचेही त्यागपत्र द्यावे लागले.
महिला आणि बालविकास मंत्र्यांचे ‘मौन’ !या प्रकरणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अद्याप मौन बाळगले आहे. ‘इतके गंभीर प्रकरण समोर आले असतांना मंत्री महोदया गप्प का ?’ असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे. |
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित