उरण (जिल्हा रायगड) येथे गावकर्‍याने पाठलाग करून गुरे चोरणारी गाडी पकडली !

प्रतिकात्मक छायाचित्र

उरण (जिल्हा रायगड) – मुलेखंड भागात कामावरून परत येतांना रात्री उमेश कोळी यांना गुरांनी भरलेली गाडी दिसली. त्यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी अडवली. त्या वेळी गुरे चोरणार्‍या टोळीने त्यांना मारहाण केली. यानंतर उमेश कोळी यांनी प्रसंगावधान साधून गावातील काही लोकांना संपर्क केला आणि लघुसंदेश केले. गावातील लोकांनी तातडीने येऊन गाडीचा पाठलाग केला. या सर्व गोष्टी होत असतांना धावपळीत गुरे चोरणार्‍यांची गाडी अचानक उलटली. त्या वेळी ग्रामस्थांनी टोळीतील दोन आरोपींना पकडून पोलिसांना संपर्क केला. त्या वेळी पोलिसांनी येऊन दोघांना कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका

  • जे गावकरी करू शकतात, ते पोलीस का करत नाहीत ?
  • राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना सर्वत्र मोठ्या प्रमाणात होणार्‍या गोतस्करीला कोण उत्तरदायी आहे ?