२३ मार्च २०२६ या दिवशी भारतीय पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियामध्ये चालू असलेल्या संघर्षावर संसदेत अनुमाने २४ मिनिटे भाषण केले. त्यांनी सध्या चालू असलेल्या पश्चिम आशियातील संकटाला एक सातत्यपूर्ण भारतीय दृष्टीकोन प्रतिबिंबित करणार्या दृष्टीने सिद्ध केले. त्यांच्या विचारामध्ये स्थिरता होती. जेव्हा जागतिक शक्ती कठोर भूमिका घेत आहेत, तेव्हा ‘भारताला गटबाजीच्या राजकारणात ओढले जाणार नाही’, हा त्यांचा संदेश स्पष्ट होता. ही भूमिका नवीन नाही; परंतु वेगाने वाढणारा संघर्ष आणि प्रादेशिक तणावाच्या कालावधीत त्याची स्पष्टता त्याला नवीन धोरणात्मक वजन देते.

१. व्यवहारातील बहुक्षेत्रीय मुत्सद्देगिरी
भारताचा प्रतिसाद बहुक्षेत्रीय मुत्सद्देगिरीला अधोरेखित करतो. तो एकाच वेळी वैविध्यपूर्ण आणि अनेकदा विरोधी भागधारकांशी संवाद साधतो. नवी देहली ही ऊर्जा आणि संपर्क यांच्या दृष्टीने इराणशी महत्त्वपूर्ण संबंध ठेवते, तर संरक्षण अन् तंत्रज्ञान यांसाठी अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी भागीदारी अधिक दृढ करते. या संतुलनाच्या कृतीमुळे भारताला लवचिकता मिळते; परंतु संयम राखण्याचीही आवश्यकता असते. भारताच्या दीर्घकालीन मुत्सद्दी भूमिकेशी सुसंगत असूनही ज्या संघर्षाच्या परिणामांवर कठोर शक्तीचे वर्चस्व आहे, त्या संघर्षात चर्चेच्या आवाहनाकडे तत्त्वनिष्ठ; परंतु अल्प लाभदायी म्हणून पाहिले जाते.

२. ऊर्जा, अर्थशास्त्र आणि धोरणात्मक सज्जता
ऊर्जा सुरक्षा ही मुख्य चिंता आहे. जागतिक तेलासाठी एक महत्त्वाची वाहिनी असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीची असुरक्षितता मोठी आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूतकाळातील अडथळ्यांमधून धडा घेऊन धोरणात्मक साठा आणि पुरवठादार विविधतेची आवश्यकता अधोरेखित केली. बाजार शांत करण्याचा आणि चलनवाढीच्या जोखमींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार्या त्यांच्या वक्तव्यांकडे पूर्वनियोजित आश्वासन म्हणून पाहिले जाऊ शकते. मोठ्या प्रमाणात आयात केलेल्या ऊर्जेवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी हे महत्त्वपूर्ण आहे.
३. मानवी आयाम : भारताचे ‘डायस्पोरा’ (देशांतरीत जनसमूह)
भूराजकारण आणि अर्थशास्त्र यांच्या पलीकडे मानवी चिंतेचा विषय आहे तो, म्हणजे पश्चिम आशियामध्ये रहाणारे अन् काम करणारे अनुमाने १ कोटी भारतीय. त्यांच्या सुरक्षेविषयी पंतप्रधानांचे आश्वासन हे उत्तरदायित्व आणि सज्जता या दोन्हींचे संकेत देते. युक्रेनपासून सुदानपर्यंतच्या मागील निर्वासन मोहिमांमधून संकटाच्या प्रतिसादात भारताची वाढती क्षमता दिसून येते. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य असे सूचित करते की, आकस्मिक नियोजन आधीच चालू आहे (अर्थात !). यामुळे देश-विदेशातील नागरिकांचा आत्मविश्वास वाढवणे, हे उद्दिष्ट आहे.
४. निष्कर्ष
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाचा अर्थ, ‘भारताची सिद्धता, नेतृत्व आणि स्थिरतेचे शांत प्रदर्शन’, असा लावला जाऊ शकतो. त्यांचे भाषण सरकारच्या सक्रीय भूमिकेवर विश्वास व्यक्त करते. तथापि व्यावहारिक असल्याने ते भारताच्या निर्बंधांकडेही निर्देश करते. भारताचे ऊर्जा अवलंबित्व, त्याच्या संतुलनाच्या कृतीची गुंतागुंत आणि परिणामांना आकार देण्याच्या त्याच्या प्रभावाच्या सध्याच्या मर्यादा सूचित करते. पंतप्रधान मोदी यांनी हे स्पष्ट केले, ‘सध्या गुंतागुंत टाळून हितसंबंध जपून ठेवा आणि धोरणात्मक स्वायत्ततेसह अशांतता दूर करा.’
लेखक : ब्रिगेडियर संजय अग्रवाल (निवृत्त), गृह मंत्रालयाचे माजी सुरक्षा सल्लागार, नवी देहली. (१४.३.२०२६)
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
‘स्मार्ट’ फसवणूक !