हॉटेल बंद झाल्याने कामगारांना खाण्या-पिण्याची अडचण !

नाशिक – येथे सिंहस्थ कुंभपर्वाची कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत; पण इंधनाच्या तुटवड्यामुळे २६ मार्चपासून पेट्रोल मिळत नसल्याने कामगारांना कामावर येणे शक्य झाले नाही. बांधकामांच्या ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. कुंभपर्वाची कामे थांबली आहेत. त्र्यंबकेश्वर शहरात गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे बहुतांश हॉटेलही बंद झाली आहेत. हातगाडी लावून चहा-पाणी, अल्पाहार विकणार्यांचाही धंदा थांबला आहे. त्यामुळे कामगारांना खाण्या-पिण्याचीही अडचण सतावत आहे.
‘सध्याची इंधनाची अडचण पहाता सिंहस्थ कुंभपर्वाची कामे वेळेत पूर्ण करणे अशक्य होईल. जिल्हा प्रशासनाने वेळीच नोंद घेऊन इंधन टंचाईची समस्या दूर करावी’, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !