उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. राघव वेदप्रकाश भट हा या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
अ. ‘मी गर्भारपणात पोटावर हात ठेवून श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्रीहरिस्तोत्र मोठ्याने म्हणत होते. तेव्हा ‘माझ्या पोटात हालचाल होत आहे’, असे मला जाणवत असे.’
– सौ. श्रेया भट (चि. राघवची आई), पुणे
२. जन्म ते ७ मास
अ. ‘चि. राघव जन्मतःच शांत आहे.
आ. आम्ही प्रसुतिगृहातून घरी जात असतांना मार्गात गायी आणि वासरे यांनी आमच्या समोर येऊन आम्हाला दर्शन दिले. तेव्हा आम्हाला तो शुभसंकेत वाटला आणि आम्हाला पुष्कळ आनंद झाला.’

– सौ. श्रेया आणि श्री. वेदप्रकाश श्रीकांत भट (चि. राघवचे आई-वडील), पुणे
इ. ‘चि. राघवचा जन्म झाल्यावर ८ दिवसांनी मी शिबिराच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची कृपादृष्टी चि. राघवच्या छायाचित्रावर पडावी’, या उद्देशाने त्यांना मी माझ्या भ्रमणभाषमधील राघवचे छायाचित्र दाखवले. तेव्हा छायाचित्राकडे पाहून त्या म्हणाल्या, ‘‘बाळ पुष्कळ सात्त्विक आहे. त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना आश्रमात घेऊन या.’’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि कृतज्ञता वाटली. त्यानंतर त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी खरोखरच राघवचे आई-वडील राघवला घेऊन रामनाथी आश्रमात आले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे शब्द खरे ठरल्याची ही प्रचीतीच होती.’
– श्रीमती श्रुती भट (चि. राघवची आजी), अकोला

ई. ‘मी पुणे येथे राघवच्या बारशाला गेले होते. तेव्हा तेथे बरेच पाहुणे आले होते. राघव पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत शांत होता. आम्ही उन्हाळ्यात अमरावती येथे एका नातेवाइकांच्या लग्नासाठी गेलो होतो. तेव्हा तेथील गर्दी आणि अनोळखी चेहरे पाहूनही राघव रडला नाही. तो एकटाच आनंदाने खेळत होता. तो स्वभावतःच शांत आहे.’
– सौ. अमृता प्रणव भट (चि. राघवची काकू), अकोला
उ. ‘चि. राघव ४ मासांचा असल्यापासून आम्ही भ्रमणभाषवर ‘हनुमान चालिसा’ लावल्यावर तो लक्ष देऊन ऐकतो. तो रडत असतांना त्याला ‘हनुमान चालिसा’ ऐकवल्यास तो शांत होतो.’
– सौ. श्रेया आणि श्री. वेदप्रकाश श्रीकांत भट

ऊ. ‘बाळ जन्मतःच पुष्कळ शांत आहे. ते पाळण्याला टांगलेल्या खेळण्याकडे पहात पुष्कळ वेळ खेळत असे.
ए. राघव ४ मासांचा असतांना आम्ही त्याला आमची कुलदेवता वणी येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनाला घेऊन गेलो होतो. त्या वेळी तिथे यात्रेमुळे प्रचंड गर्दी होती. आम्हाला ‘त्या कालावधीत तेथे यात्रा असते’, याची कल्पना नव्हती. एवढ्या गर्दीत आणि गोंधळात राघव त्याच्या आईच्या खांद्यावर गाढ झोपला होता. देवीच्या कृपाशीर्वादाने आम्हाला गर्दी टाळून देवीच्या गाभार्यात पोचता आले. आम्ही गाभार्यात गेल्यावर मात्र राघव जागा झाला. आम्ही तेथील पुजार्यांना राघवला क्षणभरासाठी देवीच्या चरणांवर ठेवण्याची विनंती केली आणि त्यांनी त्यानुसार केले. तेव्हा आम्हाला सर्वांना कृतज्ञता वाटली.’
– श्रीमती श्रुती भट (चि. राघवची आजी), अकोला
३. वय ८ मास ते १ वर्ष
३ अ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील धन्वन्तरि यज्ञाप्रती भाव : ‘मे २०२५ मध्ये गोवा येथे झालेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ मी राघवला मांडीवर घेऊन ‘यू ट्यूब’वर पाहिला. त्या वेळी धन्वन्तरि यज्ञातील मंत्र चालू असतांना मी ३ वेळा राघवचे दोन्ही हात भ्रमणभाषला लावले आणि ते त्याच्या कपाळाला लावून नमस्काराची कृती केली. त्यानंतर त्याने माझ्या हातातील भ्रमणभाष त्याच्या हातात घेऊन ३ वेळा स्वतःच्या कपाळाला लावला.’
– सौ. श्रेया भट

३ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र !’ हा ग्रंथ पाहून प्रसन्न होणे : ‘गोवा येथील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात झालेल्या धन्वंतरि यज्ञाला मी आणि माझी पत्नी सौ. अमृता यजमान म्हणून बसलो होतो. राघव लहान असल्यामुळे त्याची आई येऊ शकली नव्हती. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात आम्हाला प्रसाद म्हणून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र !’ हा ग्रंथ मिळाला. आम्ही पुणे येथे आल्यावर राघवसमोर हा ग्रंथ ठेवला. तेव्हा त्याची मुद्रा प्रसन्न झाल्याचे आम्हाला जाणवले.’
– श्री. प्रणव श्रीकांत भट (चि. राघवचे काका), अकोला
३ इ. रामनाथी आश्रमाप्रती भाव : राघवच्या पहिल्या वाढदिवसाला आम्हाला रामनाथी आश्रमाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. राघवने तेथील श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीसमोर स्वतःहून पहिल्यांदा हात जोडून नमस्कार केला. त्याने आश्रमातील महाप्रसाद आनंदाने अधिक प्रमाणात ग्रहण केला. तो आश्रमातील साधिकांच्या समवेत त्यांची आधीपासूनच ओळख असल्याप्रमाणे खेळला.
४. राघवचे स्वभावदोष : हट्टीपणा’
‘देवाने आमच्याकडून चि. राघवची गुणवैशिष्ट्ये लिहून घेतली’, त्याबद्दल आम्ही देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सौ. श्रेया आणि श्री. वेदप्रकाश श्रीकांत भट, पुणे (१४.११.२०२५)
| यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !
शिकण्याची वृत्ती आणि नामजपाची आवड असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी (वय १४ वर्षे) !
शांत, नम्र आणि देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोथरूड, पुणे येथील कु. अद्वैत सागर पाटील (वय १५ वर्षे) !
उत्तम आकलनक्षमता, जिज्ञासू वृत्ती आणि देवाची ओढ असलेली परभणी येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. संस्कृती चिद्रावार (वय ११ वर्षे) !
देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. अर्जुन ओंकार जगदाळे (वय ४ वर्षे) !
साधनेची ओढ असलेली ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची वरळी, मुंबई येथील कु. आर्या प्रशांत वैती (वय १८ वर्षे) !