|

मुंबई – येथील श्री सिद्धिविनायक मंदिरामधून कर्मचार्यांनीच दानपेटीतील पैसे चोरल्याचे वृत्त उघड झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ८ जणांना अटक केली आहे. मंदिरातील दानपेटी भरल्यानंतर ती दुसर्या खोलीत नेली जात असे. तेव्हा आरोपी कर्मचारी बोटांची कात्री करून दानपेटीतून पैसे काढायचे. गेल्या २ महिन्यांपासून हा प्रकार चालू होता. आरोपी आळीपाळीने चोरी करत आणि नंतर पैसे आपापसात वाटून घेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ८० सहस्र रुपये हस्तगत केले आहेत. अजूनही रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून काहींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राजेंद्र पेंडूरकर, शरद घाडी, समीर शिवलकर, अरविंद काडगे, अनिल राहाटे, पद्माकर आडकर, अभिषेक मुळीक, महेंद्र भाईजे अशी आरोपींची नावे आहेत.
संपादकीय भूमिका
|
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !