
गांधीनगर (गुजरात) – गुजरातमधील भाजप सरकारने विधानसभेत समान नागरी कायद्याचे विधेयक बहुमताने संमत केले. यामुळे उत्तराखंडनंतर देशात समान नागरी कायदा करणारे गुजरात दुसरे राज्य बनले आहे. गोव्यामध्ये पोर्तुगिज काळापासून हा कायदा अस्तित्वात आहे.
Gujarat becomes the 2nd state after Uttarakhand to pass the #UCC Bill! 🇮🇳
Key highlights:
🔹 Mandatory marriage & live-in registration
🔹 Uniform divorce laws for all religions
🔹 Out-of-court divorces now illegal
🔹 4-year jail term for bigamy#UniformCivilCode
PC: The Logical… pic.twitter.com/aWB3bRjLl3— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2026
कायद्यात काय आहे ?
या कायद्यात लग्नाची सक्तीची नोंदणी, घटस्फोटाचे समान नियम, दंडासह काही महत्त्वाच्या तरतुदी असणार आहेत. लग्नाची नोंदणी न करणार्यांना १० सहस्र रुपयांचा दंड, एकापेक्षा अधिक लग्न करणार्यांना ४ वर्षांची शिक्षा आहे. न्यायालयाबाहेरील घटस्फोट अवैध असतील. न्यायालयाबाहेर घटस्फोट घेतल्यास शिक्षेस पात्र ठरेल. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’साठी (जोडप्यांनी विवाह न करता एकत्र रहाण्यासाठी) ३ महिन्यांत नोंदणी करणे बंधनकारक आहे. ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ची तरतूद कायदेशीर संरक्षणासाठी आहे. अशा प्रकरणांमध्ये फसवणूक करणार्यांना गुजरातमध्ये स्थान नाही. प्रत्येक समाज आणि धर्म यांच्यासाठी घटस्फोटाचे समान नियम लागू होतील.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !