
वढू बुद्रूक (पुणे) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अधिवक्ता रोहन माळवदकर-जमादार यांना ‘शंभूसेवा’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या वेळी अधिवक्ता रोहन माळवदकर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, हा पुरस्कार माझा वैयक्तिक सन्मान नसून तो सत्य इतिहासासाठी लढणार्या आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी श्रद्धा असणार्या समस्त हिंदु समाजाचा आहे. गेल्या काही वर्षांत छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा खोटा इतिहास सांगून त्याचा संबंध वर्ष १८१८ च्या कोरेगाव भीमाच्या लढाईशी जोडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे; पण छत्रपती संभाजी महाराजांच्या कृपेमुळे आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे मला सत्य समाजासमोर मांडून जनजागृती करता आली. यासाठी मी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समिती’चे आभार मानतो. या प्रसंगी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. पांडुरंग बलकवडे, राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे, वढू बुद्रूकचे सरपंच, उपसरपंच यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !