डीजेवर बंदी येणार असेल, तर अजानवरही बंदी घातलीच पाहिजे !

श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांची मागणी

(डीजे म्हणजे मोठी संगीत यंत्रणा)

(अजान म्हणजे मशिदीत नमाजपठणासाठी बोलावणे)

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – डीजेवर बंदी येणार असेल, तर अजानवरही बंदी आली पाहिजे. त्याला भोंग्यांची आवश्यकता नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे ही बंदी असावी, याला श्रीराम सेनेचा पाठिंबा आहे.

डीजेमुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिक यांना जेवढा त्रास होतो, तेवढाच त्रास दिवसातून ५ वेळा होणार्‍या अजानमुळेही होत आहे. यावर बंदी घालण्याबद्दल कुणीही बोलत नाही, असे वक्तव्य श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांमधील मोठ्या आवाजाच्या डीजेवर लगाम घालण्याचा विचार सरकार करत आहे. यावर श्री. मुतालिक यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.