
तुळजापूर / पंढरपूर – गुढीपाडवा सणानिमित्त तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर, तसेच पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पडले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहाटे देवीची चरणतीर्थ पूजा पार पडली, महंत तुकोजी बुवा आणि महंत वाकोजी बुवा यांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर गुढी उभारून देवीला साखरेचा हार अर्पण करण्यात आला.


पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त गाभार्यात विविध रंगीबेरंगी फुलांची भव्य आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. ही सजावट विठ्ठलभक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील (रा. रांजणगाव महागणपती) यांनी सेवाभावी तत्त्वावर विनामूल्य केली असून, सजावटीचे काम पुणे येथील डेकोरेटर्सकडून पूर्ण करण्यात आले. यासाठी सुमारे १२ कामगारांनी परिश्रम घेतले. मंदिर व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
गुढीपाडव्यानिमित्त दोन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पंढरपूरात पहाटेपासूनच नामगजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला, तसेच सहस्रो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेऊन नववर्षाचा भक्तिभावाने आरंभ केला.
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !