
सहस्रो तरुण मुले गेला महिनाभर अनवाणी हिंडत होती. गोडधोड वर्ज्य, महिनाभर प्रतिदिन सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र श्रवण आणि पठण करत होती. अगदी सुतकात असल्याप्रमाणे वर्तन होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची ही धारकरी मंडळी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बलीदान मास’ पाळत होती. एरव्ही पू. भिडेगुरुजी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून दिवसभर वादग्रस्त वक्तव्य केले म्हणून ‘टी.आर्.पी.’जवळ (‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स’ – दूरचित्रवाहिन्यांवरील एखाद्या कार्यक्रमाची लोकप्रियता मोजण्याचे परिमाण) करणारी माध्यमे आणि चर्चा घडवून आणणारी मंडळी अगदी मूग गिळून गप्प आहेत. पू. भिडेगुरुजी यांच्या एका शब्दावर ही सहस्रो मंडळी प्रतिवर्षी एक महिना व्रताचरण करत आहेत. रमझानच्या इफ्तार मेजवानीच्या रसभरीत कहाण्या दाखवणारे बलीदान मासाविषयी मात्र शांत आहेत. माध्यमांवरील लोकांचा विश्वास याच एककल्ली वर्तनामुळे उडाला आहे.
– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. (२१.३.२०२६)
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची ‘लेट्सअप न्यूज पोर्टल’कडून मानहानी
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?