सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !

ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील चित्र

१. ग्रंथमालिका : शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ ! (२ ग्रंथ, १ लघुग्रंथ)

‘गुरुकृपा’ आणि ‘गुरुप्राप्ती’ शीघ्रतेने होण्यासाठी करायची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ ! कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आदी साधनामार्गांचा सुरेख संगम असणारा, तो ‘गुरुकृपायोग’ ! गुरुकृपायोगानुसार करायच्या साधनेविषयी सर्वांगाने दिशादर्शन करणारी ही अनमोल ग्रंथमालिका अवश्य वाचा !

२. ग्रंथमालिका : नामसंकीर्तनयोग (३ ग्रंथ, १ लघुग्रंथ)

दैनंदिन प्रपंचात व्यग्र असणार्‍या सर्वसामान्य सांसारिकांना आचरण्यास सुलभ असा, शुचिर्भूतता-स्थळकाळ आदी बंधनविरहित असा आणि भगवंताशी सतत अनुसंधान साधून देईल, अर्थात् साधना अखंड चालू राहील असा, एकमेव साधनामार्ग म्हणजे ‘नामजप’ ! याविषयीचे सखोल विवेचन या ग्रंथमालिकेतून जाणून घ्या !

 

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठीSanatanShop.com  संपर्क : ९३२२३१५३१७