
खेड, २१ मार्च (वार्ता.) – धर्मवीर संभाजी महाराज यांनी प्रत्येक हिंदूसाठी यमयातना भोगत आपल्या हिंदु धर्मासाठी सर्वोच्च बलीदान दिले. पूज्य भिडेगुरुजींनी हाच विचार धारकर्यांच्या मनात बिंबवला आहे. आपण कोणत्याही पदासाठी किंवा व्यक्तीचे समर्थक न होता, केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे कट्टर समर्थक झाले पाहिजे, तरच आपण खर्या अर्थाने हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करू शकू, असे मार्गदर्शन उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यवाहक श्री. प्रशांत सुभाष सावंत यांनी केले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास आणि मूक पदयात्रेचा समारोप शहरात अत्यंत भक्तीमय अन् क्षात्रतेजयुक्त वातावरणात झाला. तालुक्यातील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात भगवा ध्वज फडकवून आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
विशेष
१. महाळुंगे येथील शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ओजस्वी पोवाडा सादर केला. हा पोवाडा ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले आणि अंगावर शहारे आले.
२. शहरातून काढण्यात आलेल्या मूक पदयात्रेत शेकडो धारकरी सहभागी झाले होते. हुतात्मा अनंत कान्हेरे चौकात प्रतिकात्मक चितेला अग्नी देऊन महाराजांच्या बलीदानाचा स्मृतींना उजाळा देण्यात आला.
३. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने बलीदान मास, मूक पदयात्रा, श्री दुर्गामाता दौड, गडकोट मोहीम आणि भरणे येथील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन असे उपक्रम गेल्या २० वर्षांपासून अव्याहतपणे चालू असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
४. ‘हिंदू आहे आणि हिंदूच रहाणार’, असा वज्रनिर्धार करत, तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचा आणि प्रत्येक गावात हिंदु धर्माचे कार्य पोचवण्याचा संकल्प या वेळी धारकर्यांनी सोडला.
या सोहळ्याला खेड नगर परिषदेचे नगरसेवक श्री. स्वप्निल सैतवडेकर, श्री. यश राकेश खेडेकर, प्रतिष्ठानचे तालुका कार्यवाहक श्री. योगीराज चव्हाण, शहर कार्यवाहक श्री. अमोल जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड यांसह शहर आणि परिसरातील असंख्य धारकरी अन् नागरिक उपस्थित होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा