
समर्थ रामदासस्वामींच्या कृपाछायेखाली ।
शिवरायांना जशी दिशा लाभली । ।
तशीच धर्मरक्षणाच्या रणांगणी ।
गुरुकृपेने (टीप १) तव शब्दांनी चेतना जागली ।। १ ।।

पंचवीस वर्षांची साधना अखंड ।
जणू धर्मसेवेची तेजस्वी ज्योत ।
महाराष्ट्र, बेळगाव अन् गोवा भूमीवर (टीप २) जणू चैतन्याचा झोत ।
तुमचा धर्मप्रसार असे दिव्य अन् प्रखर ओतप्रोत ।। २ ।।
रणरागिणीची जशी तीक्ष्ण तलवार ।
तसेच तुमचे विचार असती धारदार ।
अन्याय अन् अधर्म दिसता समोर ।
घुमतो तुमचा निर्भय हुंकार ।। ३ ।।
ईश्वरचरणी एकच प्रार्थना ।
आरोग्य अन् आयुष्य वृद्धी लाभो तुम्हा ।
धर्मसंस्थापनेसाठी तुमचे कार्य ।
अखंड वृद्धींगत होत राहो सदा ।। ४ ।।
टीप १ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
टीप २ : सद्गुरु स्वाती खाडये पश्चिम महाराष्ट्र, बेळगाव अन् गोवा या ठिकाणच्या धर्मप्रसाराचे कार्य पहातात.
– श्री. चैतन्य तागडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३९ वर्षे), पुणे (४.३.२०२६)
|
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !