बिहार : हिंदु युवकासमवेत स्वतःची अल्पवयीन मुलगी पळाल्याची मुसलमान आईची पोलिसांत तक्रार !

तक्रार करणारी मुसलमान महिला

दरभंगा (बिहार) – येथे एका मुसलमान महिलेने महेश सहनी नावाच्या हिंदु युवकाविरुद्ध तिच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार केली आहे. महिलेने आरोप केला की, मुलगी घरातून दागिने आणि ७० सहस्र रुपये रोख रक्कम घेऊन पळाली. मुलीला पंजाबला नेल्याचा आरोपही महिलेने केला आहे.

मी माझ्या मुलीला हिंदु मुलाच्या स्वाधीन करू इच्छित नाही ! – मुसलमान महिला

मुसलमान महिलेने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की…,

१. मी माझ्या मुलीला हिंदु मुलाच्या स्वाधीन करू इच्छित नाही.

२. मुलगा मला व्हिडिओ पाठवतो, ज्यात तो रोख रक्कम आणि भ्रमणभाष यांसह दिसतो. माझ्या मुलीचाही व्हिडिओ पाठवतो, ज्यात तिच्या कपाळावर कुंकू, पायात पैंजण आदी दिसत आहेत.

३. माझी मुलगी दहावीची विद्यार्थिनी आहे. शेजारच्या गावातील २० वर्षांचा महेश सहनी त्याच्या मित्रासह २ जानेवारीला माझ्या मुलीला घरातून पळवून घेऊन गेला. पोलिसांत तक्रार नोंदवली; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.

संपादकीय भूमिका

  • उद्या संबंधित हिंदु युवकाचे काही बरे-वाईट झाले, तर आश्चर्य वाटू नये !
  • ‘लव्ह जिहाद’ हे हिंदूंनी रचलेले कुभांड असल्याचे म्हणणार्‍या कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी आता या घटनेवरून टाहो फोडण्यास आरंभले, तरीही आश्चर्य वाटायला नको !