मुसलमानांना रस्त्यांवर नमाजपठण करण्याचे भाग्यनगर येथील उद्दाम मुल्लाचे आवाहन !

(‘मुल्ला’ म्हणजे शरीयत आणि इस्लामी सिद्धांत यांचा अभ्यासक)

मुल्ला सैयद अयूब

भाग्यनगर (तेलंगाणा) – ईदपूर्वी शहरातील मुल्ला सैयद अयूब याचा एक वादग्रस्त व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने मुसलमानांना रस्त्यांवर नमाजपठण करण्याचे आवाहन केले आहे. ‘हैदराबाद यूथ करेज’ या स्वयंसेवी संस्थेचा आयोजक असल्याचा दावा करणार्‍या सैयद अयूबच्या इन्स्टाग्राम खात्यावर सुमारे २० लाख अनुयायी आहेत.

१. या व्हिडिओमध्ये अयूब याने म्हटले आहे की, रस्त्यांवर नमाजपठण करण्याचे आवाहन केवळ संभल (उत्तरप्रदेश) येथील मुसलमानांसाठी नसून संपूर्ण देशातील मुसलमानांसाठी आहे.

२. रस्त्यांवर नमाजपठण करण्याविषयी चेतावणी देणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांनाही त्याने आव्हान दिले. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, कुणाला वाटत असेल की, ते मुसलमानांना रस्त्यांवर नमाजपठण करण्यापासून रोखू शकतात, तर त्यांनी प्रयत्न करून पहावा. मुसलमान खटल्यांच्या किंवा कारावासाच्या धमक्यांना घाबरत नाहीत.

३. अयूबने उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयीही अवमानकारक शब्दांचा वापर केला. योगी सरकारवर टीका करतांना मुसलमानांवर विनाकारण निर्बंध लादले जात असल्याचा आरोप त्याने केला.

४. उत्तरप्रदेशातील संभल येथे कार्यरत पोलीस अधिकारी कुलदीप कुमार यांनी ‘शांतता समिती’ची बैठक घेऊन सार्वजनिक रस्त्यांवर नमाजपठण करण्यास अनुमती दिली जाणार नाही, हे स्पष्ट केले होते. मशिदीबाहेरील सार्वजनिक रस्त्यांवर नमाजपठण करतांना आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

देशातील कायदा आणि सुव्यवस्था यांना आव्हान देणारे देशद्रोहीच आहेत. अशांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे नोंदवून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !