
कोल्हापूर – ‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघ’ संचालित ‘श्री महालक्ष्मी वेद वेदांग पाठशाळा’ आणि ‘पंडित मंदार जोशी वास्तू-ज्योतिष संशोधन केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०२५-२६ या वर्षातील ज्योतिषवर्गाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास करवीरपीठाचे शंकराचार्य यांच्यासह ‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’चे अध्यक्ष वेदूमर्ती प्रसाद निगुडकर, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील ‘श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान’चे अध्यक्ष वेदमूर्ती गुंडो श्रीपाद पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती सौ. आरती घाटपांडे होत्या. या प्रसंगी ज्योतिष विषयाचे शास्त्रशुद्ध आणि पारंपरिक पद्धतीने अध्यापन करून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य पंडित मंदार जोशीगुरुजी यांच्या वतीने सातत्याने चालू असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
महाराष्ट्रासह गोवा आणि इतर राज्यांमधील अनेक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमातून ज्योतिषशास्त्राचे सखोल शिक्षण घेतले आहे. समाजात धर्मशास्त्र आणि जोतिषशास्त्र यांची परंपरा जपण्यास या उपक्रमाचा मोठा हातभार लागत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !