अंबादास दानवे यांनी घेतले महाराजांचे आशीर्वाद !

छत्रपती संभाजीनगर – ‘जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम’चे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या येथील २ दिवसीय ‘समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळ्या’ला मराठवाड्यातील भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. चौका (तालुका छत्रपती संभाजीनगर) येथील म्हसोबा महाराज मंदिरासमोरील मोठ्या मैदानावर मराठवाड्यातील कानाकोपर्यांतून आलेल्या भाविकांनी ‘जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय’च्या जयघोषात दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला. या सोहळ्याने भक्ती आणि सेवावृत्ती यांचा अनोखा संगम अनुभवला.
ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराजांची भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. या वेळी दानवे म्हणाले की, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. गुरुकृपेने समाजात सद्भावना, संस्कार आणि सेवावृत्ती अधिक दृढ होवोत, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. या वेळी त्यांच्यासमवेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
| या सोहळ्यात आलेल्या सहस्रो भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असतांनाही आयोजकांनी हार न मानता चिकाटीने या संकटावर मात केली. गॅसऐवजी १५ मोठ्या पारंपरिक चुली उभारण्यात आल्या. त्यासाठी १३ टन सरपण मागवण्यात आले. या चुलींवर १० टन खिचडी आणि ४ टन मिश्र भाजी असा महाप्रसाद शिजवण्यात आला. ‘गॅस सिलिंडर’च्या अभावी महाप्रसादात कोणताही व्यत्यय येऊ न देता आयोजकांनी ‘सेवेचा आदर्श’ घालून दिला. |
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक