
तेर (जिल्हा धाराशिव), १६ मार्च (वार्ता.) – तेर (जिल्हा धाराशिव) येथे ग्रामपंचायत आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून ८ मार्च या दिवशी सनातनचे पू. शिवाजी वटकर यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांना फेटा, शाल, श्रीफळ, हार आणि संत गोरोबा कुंभार यांचे छायाचित्र भेट देण्यात आले. पू. शिवाजी वटकर हे बुद्धीमान आणि गुणवंत विद्यार्थी म्हणून गणले जात होते. ते महाराष्ट्र संत विद्यालय, तेर येथून १० वीच्या परीक्षेत शाळेत आणि जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इयत्ता १२ वीच्या एच्.एस्.सी.च्या (‘हायर सेकंडरी सर्टिफिकेट’च्या) गुणवत्ता सूचीत त्यांचा ७ वा क्रमांक आला होता. गावचे संत आणि ते करत असलेले राष्ट्र्र आणि धर्म कार्य यांसाठी त्यांचा गौरव करून सन्मान करण्यात आला.
७ मार्च या दिवशी त्यांचे जन्मस्थान उपळे (माकडाचे), जिल्हा धाराशिव येथे उपळे ग्रामपंचायत, त्यांचे शाळेतील वर्गमित्र आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांना शाल, श्रीफळ, हार आणि श्री विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यात आली. गावकर्यांनी त्यांना उपळे येथील श्री खंडोबा, श्रीराम आणि श्री सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी नेले.
सन्मानाच्या वेळी मनोगत व्यक्त करतांना पू. शिवाजी वटकर यांनी त्यांचा जीवनप्रवास आणि साधनाप्रवास यांविषयी माहिती सांगितली. ‘जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी आबालवृद्धांनी व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा कशी केली पाहिजे ?’ याविषयी मार्गदर्शन केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेला अध्यात्मप्रसार, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण या कार्याची माहिती सांगितली.
या वेळी त्यांनी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. ग्रामस्थांनी गावामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य चालू करण्याची इच्छा व्यक्त केली.
राष्ट्र-धर्म रक्षणासाठी संघटित होण्याचे पू. शिवाजी वटकर यांनी सांगितलेले महत्त्व !
१. सध्या समाजात अस्थिरता, असुरक्षितता आणि आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली आहे. भ्रष्टाचार, आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद या संकटांनी परिसीमा गाठली आहे. यावर एकच उपाय म्हणजे ईश्वरी राज्य (रामराज्य) म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हा आहे. ही स्थापना ईश्वराच्या कृपेने होणारच आहे. यात आपली साधना आणि सेवा म्हणून प्रत्येकाने सहभाग घेतला पाहिजे.
२. हिंदूंनी संघटित होऊन धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी खारीचा वाटा उचलावा. ‘कुणी काही करत नाही किंवा असेच झाले पाहिजे’, असा नकारात्मक विचार न करता आणि अनेक जातींमध्ये विभागले न जाता हिंदु म्हणून संघटित झाले पाहिजे.
३. ‘भगवंत आपल्याकडून राष्ट्र-धर्म सेवा सेवा करून घेणारच आहे’, असा सकारात्मक विचार करून प्रत्येकाने या कार्यामध्ये योगदान द्यावे. या कार्याला ईश्वरी पाठबळ मिळण्यासाठी प्रत्येकाने नामस्मरण आणि धर्मशास्त्रात सांगितलेली साधना केली पाहिजे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
प्रत्येक गावात हवामान केंद्र उभारणार !
हिंदु युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यासह सतर्कतेवर भर द्यावा ! – अनुराग उतेकर, हिंदु राष्ट्र समन्वय समिती
वणवे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियातील पद्धतीचा अभ्यास करणार ! – वनमंत्री गणेश नाईक