कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर, १६ मार्च (वार्ता.) – कामगारांची संघटना असलेली ‘आयटक’, ‘भारतीय कम्युनिस्ट पक्ष’ यांनी कधीही भारतात ‘समान नागरी कायदा’ होण्यासाठी आंदोलन केले नाही. आमच्या बैठकांमध्ये कधीही समान नागरी कायदा होण्याच्या संदर्भात चर्चा झाली नाही, असे उत्तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे साक्षीदार शशिकांत पाटील यांनी दिले.
अधिवक्ता सोमनाथ भरमगुंडे हे पाटील यांची उलटपडताळणी घेत असून त्या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना पाटील यांनी वरील उत्तर दिले. कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे.
या वेळी बचाव पक्षाच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता नागेश जोशी, तर सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ एप्रिल या दिवशी होणार आहे.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी