हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभेमध्ये केला हिंदुत्वासाठी कार्य करणार्या धर्मविरांचा सत्कार !




हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सभेसाठी साहाय्य करणार्यांचे आभार व्यक्त !
सभेच्या पूर्वी, सभा कालावधीत आणि सभा चालू झाल्यावर अनेकांनी पुढीलप्रमाणे विविध स्तरांवर साहाय्य केले
- सभेच्या पूर्वी निवासाची सोय
- प्रसाद-महाप्रसाद यांची सोय
- सभेच्या बैठका घेणे
- सभेच्या सेवेत प्रत्यक्ष सहभागी होणे
- मैदानात लागणार्या आसंदी, पटल इत्यादी वस्तू उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी चारचाकीची व्यवस्था करणे
- फेटे बांधणे
- मैदानातील विजेची व्यवस्था, विद्युत जनित्र व्यवस्था
- व्यासपिठावरील साहित्य, हॅलोजन उपलब्ध करून देणे
यांसह अनेक गोष्टींमध्ये विविध हितचिंतकांनी सढळ हाताने साहाय्य केले. या सर्वांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यात प्रामुख्याने सर्वश्री अशोक श्रीराम, रामचंद्र अणवेकर, चंद्रकांत रमणशेट्टी, बालाजी कामूर्ती, लक्ष्मीकांत जोडमोटे, पुरुषोत्तम सग्गम, चंद्रकांत नायकोडी, दत्तात्रय जुगदार, प्रकाश तोरा, गोविंद गड्डम, श्रीनिवास (गोपी) मेरगू, रोहन चौधरी, गंगाप्रसाद बंडेवार, प्रकाश चन्ना, ‘श्री शंकर गारमेंट्स’चे मालक श्री. लिंबीतोटे, ‘कुंभार वेस व्यापारी संघटने’चे अध्यक्ष आणि ‘हॉटेल विरेश’चे श्री. रविकांत तंबाके, श्री. सुधीर मासम यांचा समावेश आहे, तसेच ज्या ज्ञात-अज्ञातांनी आर्थिक, वस्तू, तसेच विविध स्वरूपात साहाय्य केले, त्याविषयी समितीने आभार व्यक्त केले आहेत.
हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मिळालेली व्यापक प्रसिद्धी !
हिंदु राष्ट्र-जागृती सभेला पूर्वप्रसिद्धी आणि उत्तरप्रसिद्धी पुष्कळ चांगल्या प्रकारे मिळाली. यात स्थानिक वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि ‘पोर्टल’ या सर्वांचा समावेश होता. यामुळे सभेचा विषय सहस्रो लोकांपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले.

प्रसिद्धी दिलेल्या प्रसारमाध्यमांची नावे
स्थानिक वृत्तवाहिन्या : यू ट्यूब/वाहिनी : ‘सत्यदर्शन’, ‘इन न्यूज’, ‘सोलापूर विशेष’, ‘महाराष्ट्र व्हिसीबी’, ‘के सिटी न्यूज’, ‘बी.एन्.एक्स. ९’, ‘जनक्रांती’, ‘लोकदर्शन’, ‘लोकप्रधान’, ‘लोकाधिकार न्यूज’, ‘येस न्यूज’, ‘स्वरांजली’, ‘सत्यविजय न्यूज’
वृत्तपत्रे : ‘स्वाभिमानी छावा’, ‘मानदेशनगरी’, ‘तरुण भारत’, ‘दैनिक सांज, ‘सकाळ’, ‘लोकसह्याद्री’, ‘सुराज्य’, ‘जनसत्य’, ‘सांगोला चौफेर’, ‘दैनिक स्वाभिमानी’, ‘दिव्य मराठी’, ‘संचार’, ‘पुण्यनगरी’, ‘लोकमत’
पोर्टल : ‘लोकाधिकार वार्ता’, ‘बलसागर भारत’, ‘ज्ञानप्रवाह न्यूज’
हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे ‘फेसबुक’ आणि ‘यू ट्यूब’ यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात आले. याद्वारे ही सभा ४ सहस्र ५०० हून अधिक लोकांपर्यंत पोचली ! ‘बी.एन्.एक्स. ९’ या वाहिनीनेही थेट प्रक्षेपण केले. याद्वारे ही सभा २ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत पोचली !

समितीच्या कार्यावर समाजाचा वाढणारा विश्वास !
हिंदु राष्ट्र-जागृती सभा या अनुक्रमे जळगाव, हुपरी (जिल्हा कोल्हापूर), तसेच सोलापूर येथे पार पडल्या. या सर्वच सभांना महिला-युवती यांची उपस्थिती लक्षणीय होती. हिंदु जनजागृती समिती युवती-महिला यांमध्ये निर्माण करत असलेला विश्वास, धर्मपालनाचे महत्त्व, सभेच्या प्रसाराच्या काळात आघातांचे महत्त्व समजून सांगणे यांमुळे महिला-युवती यांची प्रत्येक ठिकाणी वाढती उपस्थिती, हे समितीच्या कार्यावर समाजाच्या वाढणार्या विश्वासाचे एक उदाहरण आहे.

महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !