सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत १० सहस्र हिंदूंचा धर्मरक्षणार्थ कृती करण्याचा हुंकार !

सोलापूर – जयभवानी प्रशालेच्या मैदानावर ११ मार्च या दिवशी आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा अडथळ्यांवर मात करत हिंदूंसाठी दिशादर्शक ठरली ! सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावांमधून आलेल्या १० सहस्र हिंदूंनी धर्मरक्षणार्थ कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी सद्य:स्थितीवर केलेल्या मार्गदर्शनातून उपस्थित हिंदूंना येणार्या कठीण काळात साधनाच तारू शकते, हे बिंबवले. श्री. राजन बुणगे यांच्या मार्गदर्शनातून हिंदूंनी सर्वधर्मसमभावाच्या भ्रामक कल्पनेतून बाहेर पडणे आवश्यक असून ‘नेमका शत्रूबोध कसा घ्यायचा ?’ ते लक्षात आणून दिले. लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा (निवृत्त) यांच्या शौर्ययुक्त आणि धारदार वाणीने उपस्थित हिंदूंनी ‘होय, आम्ही धर्मयुद्धासाठी सज्ज आहोत’, याची ग्वाही दिली. महिलांच्या लक्षणीय उपस्थितीसह एकूणच ही सभा हिंदूंसाठी कृतीच्या स्तरावर दिशा देणारी ठरली !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सेवा करणार्या साधकांनी अनुभवला आपत्काळ आणि गुरुकृपा !
सभेच्या काही दिवस अगोदर सभेतील वक्ता हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येणे रहित झाले. ऐनवेळी सभेत बोलणारे दुसरे वक्ते समितीचे संघटक श्री. प्रसाद वडके हेसुद्धा सभा चालू होण्याच्या पूर्वी काही घंटे आजारी पडले. त्यामुळे ऐनवेळी समितीचे श्री. राजन बुणगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मुख्य अडथळ्यांसह सोलापूर येथे पिण्याच्या पाण्याची अडचण, उन्हाची प्रचंड तीव्रता या सगळ्या अडथळ्यांवर मात करत सभा यशस्वी झाली. त्यामुळे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सेवा करणार्या साधकांनी एकाच वेळी आपत्काळ आणि तेवढ्याच प्रमाणात गुरुकृपा दोन्हीही अनुभवून गुरुचरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !