हिंदूंना दिशादर्शक ठरलेले मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन !

सोलापूर, ११ मार्च (वार्ता.) – अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्रांनी वेढलेल्या आणि सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सोलापूर येथील पवित्र भूमीत जय भवानी प्रशालेच्या मैदानात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंनी हिंदु धर्मासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार केला. या सभेत लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा (निवृत्त), सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. राजन बुणगे यांच्या मार्गदर्शनांतून हिंदुत्वाचा हुंकार निनादला. सभेसाठी उपस्थित सहस्रो हिंदूंनी ‘होय, आम्ही रामराज्यासाठी कटीबद्ध आहोत’, असे ठामपणे सांगितले.
हिंदूंनो, धर्मविरोधी चक्रव्यूह तोडण्यासाठी सिद्ध व्हा ! – लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा (निवृत्त)![]() भगवान श्रीकृष्णाने महाभारतकाळात अर्जुनाला युद्धाच्या प्रसंगी जे मार्गदर्शन केले, ते आजही शाश्वत आहे. भारताचा जर इतिहास काढून पाहिला, तर दुष्प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून दिल्यावर स्थैर्य प्राप्त झाले. आम्हाला मात्र शांतीच्या खोट्या गोष्टी सांगून भ्रमित करण्यात आले. पाकिस्तानसारख्या देशाला आपल्या भूमीचा एक तुकडा दिल्यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही आणि तो देश आजही भारतावर प्रत्येक वेळी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. भारतातील लोक नेहमीच धर्मयुद्ध समजून घेण्यास अल्प पडले. तरी या पुढील काळात हिंदूंनी धर्मविरोधी चक्रव्यूह तोडण्यासाठी आणि धर्मासाठी संघर्ष करण्यासाठी सिद्ध व्हावे. मातृशक्तीने त्यांचे दायित्व आणि शक्ती ओळखली पाहिजे अन् हिंदूंच्या अल्प होणार्या लोकसंख्येवर निश्चित विचार करण्याची आवश्यकता आहे. मातृशक्तीने तिचे दायित्व आणि शक्ती ओळखली पाहिजे अन् हिंदूंच्या अल्प होणार्या लोकसंख्येवर निश्चित विचार करण्याची आवश्यकता आहे. |
स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी धर्मरक्षणार्थ सिद्ध व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

रशिया-युक्रेन युद्ध चालू असतांना इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील भयानक संघर्ष चालू झाला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातही सीमेवर सतत युद्धजन्य स्थिती आहे. या सर्वांचे चटके म्हणून गॅस सिलिंडरची दरवाढ, तसेच अन्य मार्गांनी आपल्याला बसत आहेत. येणारा काळ तिसर्या महायुद्धाकडे जाणारा आहे. त्यामुळे पुढील काळात आपल्याला कोणतेही तंत्रज्ञान नाही, तर साधनेचे बळच उपयोगी पडणार आहे. स्वत:चे अस्तित्व राखण्यासाठी धर्मरक्षणार्थ सिद्ध व्हा !
हिंदुत्वामुळे देश पिछाडीवर जाईल, असा अपप्रचार केला जातो; मात्र ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव आहे. असे असले, तरी २ दशकांपूर्वी ‘हिंदु आतंकवाद’, ‘भगवा आतंकवाद’, असे शब्दप्रयोग हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दडपण्याचे एक ‘टूलकिट’ (एखादे षड्यंत्र पुढे रेटण्यासाठी विविध स्तरांवर आखलेली रणनीती) होते. त्यामुळे मालेगाव बाँबस्फोट, मडगाव स्फोट प्रकरण, दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या हत्या प्रकरणांत हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. यापुढील काळात हिंदूंना एकत्र येऊन अशी षड्यंत्रे हाणून पाडावी लागतील.
शत्रूबोध ओळखून धर्मबांधवांसमवेत व्यवहार करण्यास प्राधान्य द्या ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

अनेक वर्षांनंतरही सर्वधर्मसमभावाचे गारूड हिंदूंच्या डोक्यातून गेलेले नाही. आपले कोण ? परके कोण ? हे हिंदूंना लक्षात येत नाही. किंबहुना अनेक प्रसंगांत त्यांच्या लक्षात येऊनही ते धर्माधांना साहाय्य करतात. अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या त्यांच्या चांगल्या परिचित असलेल्या धर्मांधानेच केली. अशा अनेक घटना घडूनही हिंदू डोळे झाकून धर्मांधांवर विश्वास ठेवतात. तरी हिंदूंनी आपला कोण ? परकीय कोण ? हा शत्रूबोध लक्षात घेऊन कोणताही व्यवहार धर्मबांधवांसमवेत करण्यास प्राधान्य द्यायला हवे.

सर्वधर्मसमभावाच्या भ्रामक कल्पनेत गुरफटलेले हिंदू त्यांच्या भूमी धर्मांधांना विकत आहेत. ‘लव्ह जिहाद’चे भयावह संकट आपल्या प्रत्येकासमोर ‘आ’वासून उभे असून सोलापूर शहरासह अगदी ग्रामीण भागातील युवती धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत आहेत. आई-वडीलच मुली-युवती यांना धर्मशिक्षण देत नसल्याने त्यांना धर्माचा अभिमान नाही, परिणामी या समस्या वाढत आहेत. यापुढील काळात उपस्थित हिंदूंनी ‘एकही युवती ‘लव्ह जिहाद’मध्ये फसणार नाही’, असा निर्धार केला पाहिजे.
अशी झाली सभा…

- प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला.
- वेदमूर्ती श्रीनिवास जिलागुरुजी, वेदमूर्ती वेंकटाचार्य जिलागुरुजी आणि वेदमूर्ती आत्माराम चिप्पागुरुजी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणामुळे सभास्थळी चैतन्यदायी ऊर्जा निर्माण झाली. सनातन संस्थेच्या नूतन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
- समितीच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय करून दिल्यावर हिंदुत्वासाठी कार्य करणार्या धर्मविरांचा सत्कार करण्यात आला.
- यानंतर मान्यवरांनी शौर्ययुक्त वाणीने जोशपूर्ण मार्गदर्शन केले. मार्गदर्शनामुळे सर्वांना हिंदु राष्ट्राच्या कार्यात झोकून देण्याची प्रेरणा मिळाली.
- सभेच्या शेवटी विविध प्रसंगांमध्ये स्वरक्षण कसे करायचे ? याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. अफझलखानवधाचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता आणि ‘आतंकवाद कसा संपवावा लागतो ?’, याचे उत्तर मिळाले, असे उपस्थितांनी सांगितले. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली.
क्षणचित्रे आणि विशेष

- सभेसाठी उपस्थित धर्मप्रेमींनी शेवटपर्यंत शांतपणे विषय ऐकून घेतला. विशेषत: महिलावर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. सर्व महिला शेवटी ‘वन्दे मातरम्’ होईपर्यंत थांबल्या होत्या.
- सभेसाठी उपस्थित अनेक मान्यवरांनी सभेच्या पूर्वी, सभा चालू असतांना, तसेच सभा झाल्यावर सभेचा ‘फेसबुक’सारख्या सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रसार केला. यात विविध लिखाण, तसेच छायाचित्रे यांचा समावेश होता. त्यामुळे सभेचा विषय सहस्रो हिंदूंपर्यंत पोचण्यास साहाय्य झाले.
- सभेच्या ठिकाणी ‘गो सन्मान अभियान’ यांच्या वतीने प्रदर्शनकक्ष लावण्यात आला होता. याद्वारे येणार्या नागरिकांमध्ये गोमातेच्या संदर्भात जागृती करण्यात आली.
- ‘श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट’ यांनी सभेच्या ठिकाणी सोलापूर येथे बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराविषयीच्या संदर्भातील माहिती देणारा कक्ष लावला होता. याद्वारे मंदिराची माहिती भाविकांपर्यंत पोचवण्यात आली.
उपस्थित संत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर
उपस्थित संत, ह.भ.प. : पू. नागभूषणम् बिर्रु महाराज, राष्ट्रीय कथाकार महेशानंद महाराज, इंचगिरी मठाधीश ह.भ.प. पुष्पलता पाटील
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ : गोरक्षक सुधीर बहिरवाडे, सर्वश्री रवि गोणे, शिवराज गायकवाड, मयूर गवते, विजय महिंद्रकर, शीतल परदेशी, प्रवीण परदेशी, विजय यादव, शुभम् साठे, अजय कुलथे.
लोकप्रतिनिधी : भाजपचे नगरसेवक श्री. सत्यनारायण गुर्रम, ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेविका अर्चना वडनाल, नगरसेविका आणि भाजपच्या शहरप्रमुख सौ. रोहिणी तडवळकर
अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी : नगरसेवक श्री. बिज्जू प्रधाने, नगरसेवक श्री. प्रशांत पल्ली, नगरसेवक श्री. मेघनाथ येमूल, नगरसेविका सौ. उज्ज्वला दासरी, नगरसेविका सौ. चैताली गायकवाड, नगरसेविका श्रीमती सुनीता कामाठी, माजी महापौर आणि नगरसेविका सौ. श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेविका आणि भाजप शहर चिटणीस सौ. इंदिराताई कुडक्याल, नगरसेवक विजय चिप्पा, भाजपच्या शहर उपाध्यक्षा श्रीमती विजया वड्डीपल्ली, स्थायी समिती सभापती सौ. रंजिता चाकोते
अन्य मान्यवर : ‘पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम्’चे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे, सौ. मोनिका देवेंद्र कोठे (भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पत्नी)
शहरात दीप-रांगोळ्यांनी उत्साहपूर्ण स्वागत !हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी काढलेल्या प्रसारफेर्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद ! ![]() या सभेच्या प्रसारासाठी टिळक चौक ते बलीदान चौक या मार्गावर ५ मार्च या दिवशी, तसेच पूर्व भागात सिद्ध गणेश हनुमान मंदिर ते बोल्ली मंगल कार्यालय या मार्गावर ६ मार्च या दिवशी प्रसारफेरी काढण्यात आली. या प्रसारफेरीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे शेकडो कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. प्रसारफेरी ज्या भागातून गेली, त्या ठिकाणी नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. अनेक ठिकाणी धर्मध्वजाची पूजा करण्यात आली. नागरिकांनी घरासमोर रांगोळ्या काढून दिवे लावल्यामुळे परिसरात जणू दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते. या फेरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास साहाय्य झाले. याला प्रसारमाध्यमांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली, यामुळे सहस्रो नागरिकांपर्यंत हा विषय पोचण्यास साहाय्य झाले. |
हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी लोकप्रतिनिधी आणि मान्यवर यांनी दिले उत्स्फूर्त अभिप्राय
हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून हिंदु समाज एकत्र येत आहे. हिंदु जनजागृती समिती अनेक वर्षांपासून समाजात जनजागृती करत असून धर्मशिक्षणवर्गांमुळे सनातन धर्माचे महत्त्व समजू लागले आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे महिला आणि मुली यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून धर्मरक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.
– सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक, भाजप
लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, गोहत्या रोखण्यासह आपल्या घरासमोरील तुळस सुरक्षित हवी असेल, तर हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. धर्मांधांसमवेतचे व्यवहार हिंदूंनी टाळावे.
– सुरेखा गायकवाड, महिला मोर्चा उपाध्यक्षा
हिंदु राष्ट्र-जागृती सभेतून हिंदूंमध्ये जागृती निर्माण होईल ! – महेशानंद महाराज, राष्ट्रीय कथाकार, पंढरपूर
सोलापूर येथे आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ ही ऐतिहासिक ठरली आहे. आज हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे. ‘अशा सभांमधून हिंदूंमध्ये जागृती निर्माण होऊन भविष्यात मोठे परिवर्तन घडेल’, असा विश्वास आहे.
हिंदु जनजागृती समितीने धर्मकार्य हाती घेतले असून या कार्यात अधिकाधिक हिंदु बांधवांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. आपल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी होणार्या उत्सवांमध्ये प्रत्येक मंडळाने या कार्याचा प्रचार-प्रसार करावा.
– बिज्जू प्रधाने, नगरसेवक
उत्कृष्ट नियोजन आणि मार्गदर्शन यांमुळे सभेतून मिळाली नवी ऊर्जा ! – व्यंकटराव पन्हाळे, लोकाधिकारप्रमुख, लातूर
‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’साठी’ लातूर येथून उपस्थित राहिलो. सभेचे उत्कृष्ट नियोजन आणि वक्त्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यांमुळे ऊर्जा मिळाली. या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
सभेत सहभागी झाल्यामुळे पुष्कळ काही शिकता आले. या सभेत चैतन्यपूर्ण वातावरण जाणवले आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळाली. आपण प्रत्येकाने साधना करणे आवश्यक असून हिंदु राष्ट्राची स्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे.
– धनलक्ष्मी चौगुले
हिंदु राष्ट्र-जागृती सभा होणे अत्यंत आवश्यक असून समाजातील सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. या सभेतून सकारात्मक ऊर्जा मिळाली. पूर्वी असे कार्य करण्यासाठी कुठे जावे, हे समजत नव्हते; मात्र आता या सभेतून दिशा मिळाली आहे. आपण ठरवले, तर बरेच काही करू शकतो, हेही या सभेतून जाणवले.
– सौ. कल्पना अर्शनपल्ली, सामाजिक कार्यकर्त्या
सभेद्वारे धर्मशिक्षण, स्वरक्षण प्रशिक्षण यांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य झाले. हिंदु महिला-युवती यांना अमूल्य मार्गदर्शन मिळाले. ही सभा हिंदूंमध्ये जागृती करण्यास साहाय्य करील !
– श्रीमती सुनीता कामाठी, नगरसेविका, भाजप
हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ समाजात संस्कार, एकता, धर्मज्ञान आणि राष्ट्रप्रेम वाढवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे. अशा सभांमुळे समाजात जागरूकता निर्माण होते आणि आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान वाढतो. त्यामुळे सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात स्वत:चे योगदान द्यावे.
– डॉ. सूर्यप्रकाश कोठे, अध्यक्ष, ‘पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम्’
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा सभा शहराच्या पूर्व भागातही आयोजित कराव्यात; कारण तेथील अनेकांना या विषयाची माहिती नाही. शाळांमध्येही अशा सभा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यांना धर्म विषयक पुस्तकांचे वाटप करावे. विद्यार्थ्यांनी या सभांमध्ये उस्फूर्तपणे सहभागी व्हावे.
– सौ. मोनिका कोठे (भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पत्नी)
धर्म कार्यासाठी वेळ देऊ ! – श्री. प्रशांत पल्ली आणि श्री. विजय चिप्पा, नगरसेवक, भाजप
धर्मरक्षणासाठी हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे !- चैताली गायकवाड, नगरसेविका


UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !