
मुंबई – ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ हे कायदेशीर भाषेत सांगायचे झाल्यास पुढीलप्रमाणे आहे. – ‘कोणतीही व्यक्ती स्वतः अथवा इतर व्यक्ती किंवा संस्था यांच्याशी संगनमताने कृती करून, अन्य कोणत्याही व्यक्तीचे एका धर्मातून दुसर्या धर्मात – आमीष, जबरदस्ती, फसवणूक, बळजोरी, दिशाभूल, धमकी, गैरवाजवी प्रभाव किंवा कोणताही लबाडीचा मार्ग यांचा वापर करून किंवा त्याचा अवलंब करून विवाह किंवा त्या स्वरूपाचे नातेसंबंध प्रस्थापित करून किंवा विवाहाचे वचन देऊन केलेले धर्मांतर शिक्षापात्र असेल.’
प्रस्तावित कायद्याशी निगडित महत्त्वाची सूत्रे !
१. या विधेयकानुसार अपराध हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे.
२. या विधेयकानुसार बळजोरीने धर्मांतर करून झालेल्या विवाहातून झालेल्या मुलाचा धर्म हा आईचा धर्म राहील, हे महत्त्वाचे प्रावधान या कायद्यात आहे.
Major Points on Maharashtra Anti-Conversion Bill – Dharma Swatantrya Adhiniyam, 2026
३. धर्मांतरित व्यक्ती किंवा तिचे नातेवाईक धर्मांतराविरुद्ध पोलिसात प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट करू शकेल. पोलीस अधिकार्याला ती तक्रार नोंदवून घेणे अनिवार्य असेल. वरील कायद्यानुसार धर्मांतर झाल्याचे लक्षात आल्यास पोलीस अधिकारी स्वतःहूनही त्याची नोंद घेऊ शकतो.
४. या विधेयकानुसार धर्मांतर करण्यात आले नव्हते, हे सिद्ध करण्याचे दायित्व संबंधित व्यक्तीवर असेल किंवा ज्यांनी धर्मांतरास साहाय्य केले, प्रेरणा दिली त्यांच्यावर असेल.
५. या प्रकरणाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यापेक्षा उच्च दर्जाचा अधिकारीच करू शकतो. त्यापेक्षा खालच्या दर्जाचा नाही.
६. या विधेयकाच्या अंतर्गत येणारे सर्व अपराध सत्र न्यायालयाद्वारे न्यायचौकशी करण्यायोग्य असतील.
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !