उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. वेद हृषीकेश सांगवीकर हा या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२६ मध्ये कु. वेद हृषीकेश सांगवीकर याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे.’ – संकलक)
‘फाल्गुन कृष्ण दशमी (१३.३.२०२६) या दिवशी कु. वेद हृषीकेश सांगवीकर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. वेद हृषीकेश सांगवीकर याला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. प्रेमभाव
‘वेद माझी नेहमी काळजी घेतो. मला असलेल्या सायटिकाच्या (टीप) त्रासामुळे खाली वाकून काम करणे आणि अधिक चालणे शक्य होत नाही. वेद माझी अडचण समजून घेऊन मला घरकामात साहाय्य करतो. (टीप : सायटिकाचा त्रास – शरिरातील सर्वांत लांब मज्जातंतूवर (Sciatic Nerve वर) दाब पडल्याने कंबरेपासून पायापर्यंत होणारी तीव्र वेदना)
२. इतरांना साहाय्य करणे
वेदच्या शाळेतील मित्र वेदचे अभ्यासात साहाय्य घेतात. वेदही न कंटाळता मित्रांना साहाय्य करतो. त्या वेळी त्याला ‘माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, तर मी मित्रांना साहाय्य करायलाच हवे’, असे वाटत असते.
३. धर्माचरण करणे
वेद शाळेत जाण्यापूर्वी नियमित संध्या करतो. तो देवघरासमोरून जातांना देवाला नमस्कार करून पुढे जातो. त्याची ही कृती पाहून मला प्रार्थना करण्याचे स्मरण होते.
४. समंजस
काही दिवस त्याच्या शाळेची बस आमच्या वसाहतीत न येता आमच्या घरापासून दूर अंतरावर थांबत होती. तेथे जातांना चढही चढावा लागतो, तरीही वेदने मला सांगितले, ‘‘आई, तुला पायाचा त्रास आहे. तू मला बस थांब्यापर्यंत पोचवायला येऊ नकोस.’’
५. शाळेतील शिक्षकांनी वेदचे केलेले कौतुक
वेदला चित्रकला शिकवणारे शिक्षक सांगतात, ‘आम्ही सांगितलेले वेदला लगेच आकलन होते. त्याप्रमाणे तो कृतीही लगेच करतो.’’ वेद आता नवीन शाळेत जाऊ लागला आहे. त्या शाळेतील शिक्षिका म्हणाल्या, ‘‘वेद या शाळेत नुकताच आला आहे’, असे वाटत नाही. तो शाळेत छान रुळला आहे.’’
शांत आणि समंजस कु. वेद सांगवीकर !

१. ‘वेद शांत आणि समंजस आहे.
२. त्याला आध्यात्मिक त्रास झाल्यास तो त्याला सांगितलेले नामजपादी उपाय मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
३. वेदच्या आईला शारीरिक त्रास होत असल्यास तो आईला नामजपादी उपाय करण्याची आठवण करून देतो. तो आईला सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देतो.
४. त्याच्यामध्ये प.पू. गुरुदेवांप्रती भाव आहे. ‘गुरुदेवांच्या कृपेने उपायांनी त्रास न्यून होणार’, अशी त्याची श्रद्धा असते.’
– (पू.) सौ. मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४४ वर्षे), पुणे (५.३.२०२६)
६. वेद रात्री नियमित क्षमायाचना आणि प्रार्थना करूनच झोपतो.

७. भाव
७ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव : तो प्रतिदिन रात्री झोपतांना उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवतो. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्यामुळे रात्रभर माझे रक्षण होणार आहे’, असा त्याचा भाव असतो.
७ आ. संत आणि सद्गुरु यांच्या प्रती भाव : त्याच्यामध्ये सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४४ वर्षे) यांच्या प्रती भाव आहे. एकदा पू. मनीषाताईंनी वेदला रंगपेटी भेट दिली. ती त्याने अजून जपून ठेवली आहे. ‘एलिमेंटरी’च्या (चित्रकलेची एक परीक्षा) परीक्षेच्या वेळी ही रंगपेटी वापरली, तर देवाचे आशीर्वाद मिळतील’, असा त्याचा भाव आहे.
७ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव : वर्ष २०२५ मध्ये गोवा येथे झालेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) दर्शनाने वेदची भावजागृती झाली.
८. देवाप्रती श्रद्धा
अ. एकदा त्याच्या आजीला (सौ. संजीवनी कोळेश्वर, वेदच्या आईची आई, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७१ वर्षे यांना) शारीरिक त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी मी वेदला सांगितले, ‘‘मला आजीची काळजी वाटते.’’ तेव्हा वेद मला म्हणाला, ‘‘आई, तू सर्वकाही देवावर सोपवून शांत रहा.’’ त्याने तसे सांगितल्यावर मला शांत वाटले.
आ. एकदा तो ‘टेबल टेनिस’ खेळत असतांना पटल सरकून त्याच्या अंगावर आले; मात्र ते पटल त्याच्या अंगावर न पडता त्याच्यापासून काही अंतरावर पडले. त्या वेळी त्याला ‘देवानेच वाचवले’, असे वाटून कृतज्ञता वाटत होती.
‘हे श्रीकृष्णा, ‘तुला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न तूच आमच्याकडून करून घे’, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– सौ. दीप्ती हृषीकेश सांगवीकर (कु. वेदची आई), कोथरूड, पुणें (१.२.२०२६)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
|
सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !
शिकण्याची वृत्ती आणि नामजपाची आवड असलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. मृणाल नीलेश जोशी (वय १४ वर्षे) !
शांत, नम्र आणि देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कोथरूड, पुणे येथील कु. अद्वैत सागर पाटील (वय १५ वर्षे) !
उत्तम आकलनक्षमता, जिज्ञासू वृत्ती आणि देवाची ओढ असलेली परभणी येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. संस्कृती चिद्रावार (वय ११ वर्षे) !
देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील चि. अर्जुन ओंकार जगदाळे (वय ४ वर्षे) !
साधनेची ओढ असलेली ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची वरळी, मुंबई येथील कु. आर्या प्रशांत वैती (वय १८ वर्षे) !