
मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – बिष्णोई टोळीने २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे खोटे वृत्त देऊन स्वत:ची अपकीर्ती केल्याप्रकरणी भाजपचे अकोट येथील आमदार प्रकाश भारसाकळे यांनी १२ मार्च या दिवशी विधानसभेत पत्रकारांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी अन्वेषण करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
पत्रकार रवीराज मोरे, ‘एबीपी माझा’चे उमेश अलोणे, ‘साम टीव्ही’चे अक्षय गवळी आणि ‘महाव्हॉईस’चे संजय आठवले यांच्या विरोधात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हक्कभंग मांडला. बिष्णोई टोळीचे शुभम् लोणकर यांनी भाजपच्या शहराध्यक्षांना दूरभाष करून पैशांची मागणी केल्याचा उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आला होता.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !