
रत्नागिरी – सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने महिला दिनाचा कार्यक्रम येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे साजरा झाला. याप्रसंगी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन आणि उद्योजिका वर्षा पटवर्धन या दोन सख्ख्या बहिणींची प्रेरणादायक मुलाखत रंगली. नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांनीही या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधला.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे म्हणाल्या की, ३६५ दिवस महिला दिवस असतो. स्त्री कुटुंबाचा कणा आहे. सीए भगिनी आकडेमोड करता. त्यामुळे त्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करतात. स्त्रिया सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. आई म्हणजे वित्त व्यवस्थापक (फायनान्स मॅनेजर) आहे. कोणतीही पदवी केवळ महत्त्वाची नाही, त्याचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे. महिलांनी एकमेकांना साहाय्य केले पाहिजे. अत्याचार अल्प झाले पाहिजेत. दुसर्या स्त्रीचे दुःख समजून घेऊन वागले पाहिजे.
सीए स्नेहा भिंगारदिवे यांनी शिल्पाताई आणि वर्षा पटवर्धन यांची मुलाखत घेतली. त्या वेळी वर्षा पटवर्धन म्हणाल्या की, वडील आणि व्यायामपटू, अंबाबाई तालीम मंडळाचे प्रमुख, वैद्य म.द. तथा अप्पा करमरकर यांच्यामुळे व्यायामाची सवय लागली. आम्ही ९ बहिणी. त्यामुळे सर्वांनाच व्यायामाची लहानपणापासून सवय. तेहरान, इराणमध्ये वर्ष १९७३ मध्ये आयोजित ‘वूमन्स कॉन्फरन्स’मध्ये आम्ही ११ जणी गेलो होतो. त्यात आम्ही दोघी होतो. त्या वेळी मल्लखांब आणि योग प्रात्यक्षिके केली होती. सिंगापुरी वेताचा मल्लखांब आम्ही दाखवला होता. २१ दिवस अन्य शहरांमध्येही आम्हा भारतीय संघाला संधी मिळाली होती. सर्वत्र आमचे कौतुक झाले. भारतात परतल्यावर पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटलो होतो. त्या वेळी करमरकर यांच्या कन्या म्हणून चव्हाण यांनी पुष्कळ कौतुक केले होते. विवाहानंतर रत्नागिरीत आल्यावर फाटक हायस्कूलमध्ये योग शिकवत होते. वर्ष १९९३ मध्ये रत्नागिरीतील पहिला श्री वैभव हेल्थ क्लब चालू केला. आजच्या काळात मुलींच्या अनेक समस्या पहातो; परंतु महिलांनी सातत्य, जिद्द ठेवली पाहिजे. महिलांनी प्रतिदिन किमान अर्धा घंटा अनुलोम-विलोम, कपालभाती योग आणि १२ सूर्यनमस्कार घातले पाहिजेत.
शिल्पा पटवर्धन म्हणाल्या की, खेळ किंवा व्यायामामुळे आयुष्यात कोणत्याही अडचणीच्या प्रसंगाला सामोरे जावू शकतात, नकार पचवू शकतात. खिलाडू वृत्ती त्यांच्याकडे येते. मन प्रसन्न रहाते. सक्रीयता, जिद्द, मनात सिद्ध होते. आपले कोणतेही काम होणार आहे, अशी भावना जाणवते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन हा विषय शिकवला पाहिजे. संस्थाप्रमुख म्हणून काम करतांना कसे वागता ?, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, कामचुकार माणसाला प्रमुख करा, एखाद्याने चांगले काम केले, तर त्याचे कौतुक ४ लोकांत करा आणि कुणाचीही चूक झाली, तर ती एकट्याला सांगा.
या कार्यक्रमात सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए केदार करंबेळकर यांनी मान्यवरांचा सत्कार पुष्परोपटे देऊन केला. तसेच प्रास्ताविक करतांना त्यांनी अध्यक्षपदाचा भार आणि नवीन कमिटी झाल्यानंतरचा हा पहिलाच कार्यक्रम असून महिला नियोजनकार, अष्टपैलू असल्याचे सांगून महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या. सीए नयन सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी कमिटी सदस्य, महिला सीए, सीए फर्ममधील महिला कर्मचारी उपस्थित होते.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव