
आगरा (उत्तरप्रदेश) – भारतीय नौदलात लान्स नायक असलेला आदर्श कुमार उर्फ लकी याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.साठी (‘इंटर-सर्विसेस इंटेलिजन्स’साठी) हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याला आगरा येथील कागारौलच्या चीतपूर गावातून अटक करण्यात आली आहे. सध्या त्याची नियुक्ती दक्षिण नौदल कमांड, कोची (केरळ) येथे होती. त्याचे २२ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.
🚨 Spy Within the Forces? Serious Threat to National Security! 🇮🇳
Adarsh Kumar, a Lance Naik in the Indian Navy, has been arrested by UP ATS for allegedly spying for Pakistan.
If such traitors operate within the Indian armed forces, it poses a grave threat to India’s national… pic.twitter.com/cwDOEMKPbM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 11, 2026
१. लग्नानंतर आदर्श कुमार त्याच्या पत्नीला दुबईला फिरायला घेऊन गेला होता. तो गावात परत आल्यावर त्याला त्याला पोलिसांनी अटक केली. आदर्श अनुमाने ७ वर्षांपूर्वी नौदलात भरती झाला होता.
२. आदर्श कुमार याने आय.एस्.आय.च्या दलालास देशातील युद्धनौकांची छायाचित्रे आणि तपशील पाठवला आहे. याची पुष्टी त्याच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून झाली.
३. आदर्श कुमार अनेक दिवसांपासून पाकसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती सुरक्षायंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर त्याच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली होती.
४. आदर्श कुमार याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या हेरगिरीच्या जाळ्यात आणखी किती जण सहभागी आहेत ?, याचे पोलीस अन्वेषण करत आहेत.
५. साधारण १ वर्षापूर्वी आगरा येथील रवींद्र कुमार याला पाकसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तो फेसबुकद्वारे नेहा शर्मा नावाच्या महिलेच्या संपर्कात आला होता.आदर्श कुमार हाही रवींद्र कुमार याच्याप्रमाणे ‘हनी ट्रॅप’मध्ये (महिलेच्या माध्यमातून व्यक्तीला जाळ्यात अडकवणे) अडकला असावा, असा सुरक्षायंत्रणांचा अंदाज आहे.
संपादकीय भूमिकाभारतीय सैन्यात जर अशा प्रकारे फितूर माणसे कार्यरत असतील, तर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक धोकादायक होय ! अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशी देणे आवश्यक ! |
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप