हिंदुत्वनिष्ठ सुनील देवधर यांचे व्याख्यान

सांगली – हिंदु एकता आंदोलन संघटनेचा तिसरा ‘गुढीपाडवा मेळावा’ रविवार, २२ मार्च या दिवशी सायंकाळी ६ वाजता येथील मारुति चौकात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुनील देवधर यांचे ‘बांगलादेश आणि बंगालमधील हिंदूंचा नरसंहार, हिंदूंनो जागे व्हा’, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याला समस्त हिंदूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने सांगली येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ‘‘हिंदु एकता आंदोलन संघटनेची महिला आघाडी आणि युवा आघाडी यांची स्थापना या मेळाव्यात करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे, धुळे येथून हिंदु एकताचे पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्यामध्ये ‘महाराष्ट्र हिरवा करू म्हणणारे धर्मांध, बांगलादेशी घुसखोर, संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार, मालेगावच्या महापालिकेमध्ये लावलेले टिपू सुलतानचे छायाचित्र, गड जिहाद, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद, इराणचे राष्ट्राध्यक्ष खामेनी याच्या मृत्यूनंतर धर्मांधांनी भारतामध्ये घातलेला धुमाकूळ, या सर्व विषयांवर मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.’’
या वेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, रावसाहेब खोजगे, प्रसाद रिसवडे, पै. प्रदीप निकम, प्रकाश चव्हाण, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, अरविंद यतनाळे, सोमनाथ गोटखिंडे, प्रकाश निकम, सचिन देसाई, भूषण गुरव, अनिकेत अंबरुळे, सुमित शिंगे, गजानन माने, विकास आवळे, यश पाटील, प्रेम देसाई, कृष्णा नायडू, नारायण हांडे, संदेश खोत, प्रथमेश खिलारे आणि अन्य अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा